जर्मनीत अल्पवयीन तरुणाचा कु-हाडीने ट्रेन प्रवाशांवर हल्ला, पोलिसांनी केलं ठार
By Admin | Updated: July 19, 2016 12:44 IST2016-07-19T07:58:58+5:302016-07-19T12:44:20+5:30
दक्षिण जर्मनीत एका 17 वर्षीय अल्पवयीन तरुणाने ट्रेनमधील प्रवाशांवर कु-हाड आणि चाकूने हल्ला केला ज्यामध्ये प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत

जर्मनीत अल्पवयीन तरुणाचा कु-हाडीने ट्रेन प्रवाशांवर हल्ला, पोलिसांनी केलं ठार
>ऑनलाइन लोकमत -
बर्लिन, दि. 19 - दक्षिण जर्मनीत एका 17 वर्षीय अल्पवयीन तरुणाने ट्रेनमधील प्रवाशांवर हल्ला केला. कु-हाड आणि चाकूने केलेल्या या हल्ल्यात 3 प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. अफगाणिस्तानचा नागरिक असणा-या या तरुणाने घटनास्थळावरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला असता पोलिसांनी त्याला ठार केलं आहे.
बवेरिया शहराचे मंत्री जोआचिम हेर्रमन यांनी हल्लेखोर तरुण अफगाण नागरिक ओच्सेनफर्ट येथे राहत होता अशी माहिती दिली आहे. स्थानिक वेळेनुसार रात्री 9.15 वाजता स्टेशनला ट्रेन पोहोचली असता काही वेळातच तरुणाने कु-हाड आणि चाकूच्या सहाय्याने प्रवाशांवर हल्ला करण्यास सुरुवात केली अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.
3 प्रवासी गंभीर जखमी झाले असून इतर प्रवाशांना किरकोळ जखमा झाल्या आहेत. हल्ला केल्यानंतर तरुणाने घटनास्थळावरुन पळ काढला असता पोलिसांनी त्याचा पाठलाग केला. पोलिसांनी गोळ्या घालून त्याला ठार केलं असल्याचंही पोलिसांनी सांगितलं आहे. हल्ल्याचं नेमक कारण अजून कळू शकलेलं नाही.