जर्मनीत बारमध्ये स्फोट, संशयित आत्मघाती हल्लेखोराचा मृत्यू
By Admin | Updated: July 25, 2016 07:26 IST2016-07-25T07:26:44+5:302016-07-25T07:26:44+5:30
जर्मनीच्या पश्चिम भागात अॅन्सबॅच शहरातील बारमध्ये आत्मघाती हल्लेखोराने स्फोट घडवून आणला, स्फोटात हल्लेखोराचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे

जर्मनीत बारमध्ये स्फोट, संशयित आत्मघाती हल्लेखोराचा मृत्यू
>ऑनलाइन लोकमत -
बर्लिन, दि. 25 - जर्मनीच्या पश्चिम भागात अॅन्सबॅच शहरातील बारमध्ये आत्मघाती हल्लेखोराने स्फोट घडवून आणला आहे. या स्फोटात हल्लेखोराचा मृत्यू झाला असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. स्फोटात 12 हून अधिक लोक जखमी झाले आहेत. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास हा स्फोट झाला.
ओपन-एअर म्युझिक फेस्टिव्हलसाठी 2500 लोक या ठिकाणी जमले होते. हल्लेखोराला या लोकांना टार्गेट करायचं होतं असा दावा स्थानिक वृत्तवाहिन्यांनी केला आहे. 'सिटी सेंटरमध्ये हा स्फोट घडला. तपास केला असता ज्या व्यक्तीने हा स्फोट घडवला, तो यामध्ये मृत्यूमुखी पडला असल्याचं', पोलिसांनी सांगितलं आहे. 12 लोक जखमी झाले असून 3 जण गंभीर आहेत.