जॉर्जिया मेलोनी सरकारचा चीनला मोठा झटका, अनेक दशकं विसरणार नाही ड्रॅगन!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 6, 2023 10:46 PM2023-12-06T22:46:14+5:302023-12-06T22:46:34+5:30

महत्वाचे म्हणजे, हा युरोपातील पहिला देश आहे ज्याने BRI मध्ये सहभागी होण्यास सहमती दर्शवली होती.

Georgia Meloni government's big blow to China, will not forget the dragon for many decades | जॉर्जिया मेलोनी सरकारचा चीनला मोठा झटका, अनेक दशकं विसरणार नाही ड्रॅगन!

जॉर्जिया मेलोनी सरकारचा चीनला मोठा झटका, अनेक दशकं विसरणार नाही ड्रॅगन!

इटलीच्या जॉर्जिया मेलोनी सरकारने चीनला जबरदस्त झटका दिला आहे. चीनच्या बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह (BRI) मधून इटलीने अधिकृतपणे माघार घेतली आहे. चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्या या पायाभूत सुविधा प्रकल्पाला हा मोठा धक्का मानला जात आहे. महत्वाचे म्हणजे, हा युरोपातील पहिला देश आहे ज्याने BRI मध्ये सहभागी होण्यास सहमती दर्शवली होती.

पीएम मेलोनी या पहिल्यापासूनच या प्रकल्पा विरोधात बोलत होत्या. इटलीने 2019 मध्येच BRI मध्ये सहभआगी होण्याचा निर्णय घेतला होता. या उपक्रमांतर्गत चीन जगभरातील रस्ते, रेल्वे, बंदरे आणि इतर पायाभूत सुविधांच्या विकासासाठी गुंतवणूक करत आहे. जॉर्जिया मेलोनी सरकारच्या या निर्णयाची संपूर्ण जगभरात चर्चा सुरू आहे.

निर्णयामागे अनेक कारणं - 
अभ्यासकांच्या मते इटलीच्या या निर्णयामागे अनेक कारणे आहेत. एक म्हणजे, इटलीवरील चीनच्या कर्जाची चिंता. दुसरे म्हणजे, BRI आपल्या राष्ट्रीय हिताचे नाही, असे इटलीला वाटते. इटलीच्या या निर्णयाचा चीनवर काय परिणाम होईल, हे अद्याप स्पष्ट नही. मात्र, हा निर्णय BRI च्या भविष्यासाठी एक आव्हान  आहे, हे स्पष्ट. 

माध्यमांतील वृत्तांनुसार, इटलीच्या परराष्ट्रमंत्री लियोनॉर्डो डी'इलिया यांनी म्हटले आहे की, इटलीने बीआरआय सोबतचा करार संपवला आहे, कारण तो देश हिताचा नाव्हता. एवढेच नाही तर, बीआरआय योजनेंतर्गत इटलीला चीनकडून मोठे कर्ज घ्यावे लागत होते, जे देशासाठी आर्थिक ओझे झाले होते.

 

Web Title: Georgia Meloni government's big blow to China, will not forget the dragon for many decades

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.