नेपाळमध्ये काही दिवसापूर्वी Gen-Z ने मोठे आंदोलन केले होते. या आंदोलनाला थांबवण्यासाठी केपी शर्मा ओली सरकारने गोळीबार केला होता. यानंतर या आंदोलनामध्ये हिंसाचार झाला होता. दरम्यान, आता नेपाळमध्ये पुन्हा एकदा Gen-Z रस्त्यावर उतरली आहे.
माजी पंतप्रधान केपी शर्मा ओली यांच्या पक्षाच्या, सीपीएन-यूएमएलच्या कार्यकर्त्यांसह "Gen-Z मध्ये झालेल्या हिंसक संघर्षानंतर बुधवारी भारताच्या सीमेवर असलेल्या नेपाळच्या बारा जिल्ह्यातील काही भागात कर्फ्यू लागू करण्यात आला. सिमरा विमानतळाच्या ५०० मीटरच्या परिघात दुपारी १२.३० ते रात्री ८ वाजेपर्यंत कर्फ्यू लागू राहील, असे बारा जिल्हा प्रशासनाने सांगितले.
डोनाल्ड ट्रम्प पुन्हा बरळले; 350 टक्के शुल्काची धमकी देऊन भारत-पाक युद्ध थांबवल्याचा केला दावा
कम्युनिस्ट पार्टी ऑफ नेपाळ किंवा सीपीएन-यूएमएलच्या विरोधात घोषणाबाजी करत शेकडो "Gen-Z" युवक तेथे जमले होते. मिळालेल्या माहितीनुसार, सीपीएन-यूएमएलचे सरचिटणीस शंकर पोखरेल आणि पक्षाचे युवा नेते महेश बसनेट यांना घेऊन जाणारे बुद्ध एअरचे विमान काठमांडूहून सिमराला जात असताना हाणामारी सुरू झाली. दोन्ही नेते तिथे सरकारविरोधी रॅलीला संबोधित करणार होते. सिमरामध्ये त्यांच्या आगमनाची बातमी पसरताच, 'Gen-Z' निदर्शक घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी निषेध करण्यास सुरुवात केली. निषेधादरम्यान उपस्थित असलेल्या स्थानिक सीपीएन-यूएमएल कार्यकर्त्यांशी त्यांची झटापट झाली.
या घटनेनंतर, बुद्ध एअरलाइन्सने काठमांडू ते सिमरा पर्यंतच्या सर्व देशांतर्गत उड्डाणे रद्द केल्याचे वृत्त आहे. १२ सप्टेंबर रोजी विसर्जित झालेल्या प्रतिनिधी सभागृहाची पुनर्स्थापना करण्याच्या मागणीसाठी सीपीएन-यूएमएल नेपाळमध्ये निदर्शने करत आहे.
Web Summary : मागील संघर्षानंतर नेपाळमध्ये पुन्हा Gen-Z चा उद्रेक झाला, बारा जिल्ह्यात कर्फ्यू. सीपीएन-यूएमएल नेत्यांच्या सिमरामध्ये आगमनानंतर निदर्शने भडकली. अशांततेमुळे उड्डाणे रद्द झाली. विसर्जित विधानसभेच्या पुनस्थापनेची मागणी करत निदर्शने.
Web Summary : पिछले संघर्षों के बाद, नेपाल में जेन-जेड का विरोध फिर से भड़क उठा, जिससे बारा जिले में कर्फ्यू लग गया। सीपीएन-यूएमएल नेताओं के सिमरा पहुंचने के बाद प्रदर्शन शुरू हो गए। अशांति के कारण उड़ानें रद्द कर दी गईं। प्रदर्शनकारी विधानसभा को बहाल करने की मांग कर रहे हैं।