गाझात भीषण लढाई, 150 ठार
By Admin | Updated: July 22, 2014 00:44 IST2014-07-22T00:44:14+5:302014-07-22T00:44:14+5:30
इस्नयली लष्कर व हमासमधील भीषण लढाई सोमवारीही अथकपणो सुरू होती.

गाझात भीषण लढाई, 150 ठार
गाझा/जेरुसलेम : इस्नयली लष्कर व हमासमधील भीषण लढाई सोमवारीही अथकपणो सुरू होती. दोन आठवडय़ांपासून सुरू असलेल्या या संघर्षात 535 जणांचा बळी गेला असला तरी दोन्ही पक्ष तसूभरही मागे हटण्यास तयार नाहीत.
बळींची संख्या वाढत असल्याने संयुक्त राष्ट्रसंघाने तातडीने शस्त्रसंधीचे आवाहन केले; मात्र त्यालाही संघर्षरत पक्षांनी प्रतिसाद दिला नाही. इस्नयलकडून आज गाझात करण्यात आलेल्या हल्ल्यात 15क् जण मारले गेले. यात दक्षिण इस्नयलमध्ये घुसलेल्या 1क् हून अधिक हमास दहशतवाद्यांचा समावेश आहे.
इस्नयलमध्ये हल्ले करण्यासाठी हमासच्या दोन पथकांनी बोगद्याद्वारे घुसखोरी करण्याचा प्रयत्न केला; मात्र इस्नयली सुरक्षा दलांनी त्यांना हेरले व त्यांना अडविण्यासाठी तातडीने हेलिकॉप्टर रवाना करण्यात आले. हमासचे पहिले पथक दिसल्यानंतर हवाई हल्ल्याद्वारे त्यांना टिपण्यात आले. दरम्यान, गाझा पट्टीतील भीषण संघर्षाच्या पाश्र्वभूमीवर तात्काळ शस्त्रसंधी लागू केली जावी यासाठी अमेरिकी अध्यक्ष बराक ओबामा हे परराष्ट्रमंत्री जॉन केरी यांना इजिप्त दौ:यावर पाठविणार आहेत. (वृत्तसंस्था)