युद्धबंदीनंतर गाझात नागरिकांची वर्दळ
By Admin | Updated: August 12, 2014 03:13 IST2014-08-12T03:13:40+5:302014-08-12T03:13:40+5:30
गाझात सोमवारी ७२ तासांची युद्धबंदी लागू झाल्यानंतर इस्रायल आणि पॅलेस्टीनचे संवादक महिनाभरापासून सुरू असलेल्या घातक संघर्षावर तोडगा काढण्यासाठी इजिप्तची राजधानी कैरोकडे रवाना झाले

युद्धबंदीनंतर गाझात नागरिकांची वर्दळ
गाझा सिटी : गाझात सोमवारी ७२ तासांची युद्धबंदी लागू झाल्यानंतर इस्रायल आणि पॅलेस्टीनचे संवादक महिनाभरापासून सुरू असलेल्या घातक संघर्षावर तोडगा काढण्यासाठी इजिप्तची राजधानी कैरोकडे रवाना झाले. मध्यरात्रीनंतर लागू झालेली युद्धबंदी इजिप्तच्या अनेक दिवसांपासूनच्या प्रयत्नांचा परिणाम आहे. गाझातील संघर्षात आतापर्यंत १९३९ पॅलेस्टिनी आणि ६७ इस्रायली मारले गेले आहेत. आठ जुलैला हा संघर्ष सुरू झाला होता. दहा तासांपासून सुरू युद्धबंदीचे दोन्ही पक्षांकडून उल्लंघन झाल्याचे वृत्त अद्याप नाही. (वृत्तसंस्था)