गाझापट्टीत पुन्हा संघर्ष भडकला
By Admin | Updated: July 29, 2014 23:53 IST2014-07-29T23:53:56+5:302014-07-29T23:53:56+5:30
गाझापट्टीतील संघर्षात 2क् व्या दिवशी सोमवारी खंड पडतोय असे वाटत असतानाच इस्रायल व हमासकडून पुन्हा परस्परांवर हल्ले सुरू झाले.

गाझापट्टीत पुन्हा संघर्ष भडकला
गाझा/जेरूसलेम : गाझापट्टीतील संघर्षात 20 व्या दिवशी सोमवारी खंड पडतोय असे वाटत असतानाच इस्रायल व हमासकडून पुन्हा परस्परांवर हल्ले सुरू झाले. इस्रायली लष्कराच्या हल्ल्यात सात मुलांसह दहा जण मारले गेले. गाजातील सर्वात मोठय़ा रुग्णालयावरही हल्ला केला गेला.
संयुक्त राष्ट्र व अमेरिका यांनी 2क् दिवसांपासून सुरू असलेला हिंसक संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी शाश्वत शस्त्रसंधीचे आवाहन केले आहे.
संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने ईदनंतरही शस्त्रसंधी कायम ठेवून गाझात आवश्यक मदत पुरविण्याची मोकळीक देण्याचे आवाहन उभय पक्षांना केले आहे. (वृत्तसंस्था)
4 जेरुसलेम : गाझापट्टीवरील संघर्षात मृत्युमुखी पडलेल्या भारतीय वंशाच्या इस्नयली सैनिकांच्या अंत्यसंस्काराला हजारो नागरिक उपस्थित होते. संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आवाहनानंतर हमास व इस्नयल यांच्यातील शस्त्रसंधीदरम्यान झालेल्या हल्ल्यात बराक राफील देगोरकर यांचा मृत्यू झाला. गान याव्ने या त्यांच्या गावी सैन्य दफनभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.