शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

GAZA Attack: इस्त्रायलची खतरनाक, अचूक 'आयर्न डोम' यंत्रणा चुकली; हमासचे रॉकेट समजून स्वत:चेच ड्रोन पाडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2021 13:41 IST

Israel’s Iron Dome Shot-Down Its Own Drone: इस्त्रायलच्या डिफेन्स फोर्सने १७ मे ला ही घोषणा केली होती. हमासने सांगितले की, युद्धावेळी आम्ही अनेक ड्रोन इस्त्रायलवर हल्ला करण्यासाठी पाठविले होते. यामध्ये शेहाब नावाचा एक नवीन आत्मघातकी ड्रोन आहे.

तेल अवीव : इस्त्रायल फोर्सेस (IDF) ने पॅलेस्टाईन दहशतवाद्यांशी लढताना एक रॉकेट पाडले होते. मात्र, ते इस्त्रायलचेच (Israel) ड्रोन असल्याचे समोर आल्याने मोठी खळबळ  उडाली आहे. इस्त्रायलचे सैन्य एल्बिट स्कायलार्क ड्रोन हेरगिरीसाठी वापरते. इस्त्रायलचे सुरक्षा कवच असलेल्या आयर्न डोम बॅटरीने हमासचे रॉकेट असल्याचे समजून मिसाईल फायर केले आणि आपलेच ड्रोन पाडले. (Israel Defense Forces (IDF) shot down one of their own drones during the 11-day conflict with Gaza-based militant groups, the service confirmed Tuesday.)

या घटनेमुळे इस्त्रायलच्या सैन्याला मोठा धक्का बसला असून ड्रोन ऑपरेशन आणि दुश्मनांच्या रॉकेटना युव्हीद्वारे ओळखण्यासाठी त्यांच्या अभेद्य आयर्न डोमला बदलण्याची तयारी केली जात आहे. इस्त्रायलचे अधिकारी आता भविष्यात आपलेच ड्रोन पुन्हा पाडले जाऊ नयेत यासाठी तयारी करत आहेत. यासाठी इस्त्रायल सैन्य आणि हवाई दल सोबत मिळून काम करत आहेत. इस्त्रायलचे वृत्तपत्र हारेत्ज़ने सर्वात आधी हे ड्रोन पाडले गेल्याची बातमी दिली होती. मात्र, सरकारकडून याचा स्वीकार करण्यात आला नव्हता. 

आता इस्त्रायलच्या सैन्याने हे मान्य केले आहे. त्यांच्या आयर्न डोमने चुकीने आपलेच ड्रोन पाडले, असे म्हटले आहे. मात्र, ही घटना कधी घडली ते मात्र सांगितलेले नाही. तसेच या युद्धात किती ड्रोन पाडले गेलेत हे देखील स्पष्ट करण्यात आलेले नाहीय.

इस्त्रायलच्या डिफेन्स फोर्सने १७ मे ला ही घोषणा केली होती. हमासने सांगितले की, युद्धावेळी आम्ही अनेक ड्रोन इस्त्रायलवर हल्ला करण्यासाठी पाठविले होते. यामध्ये शेहाब नावाचा एक नवीन आत्मघातकी ड्रोन आहे. हे ड्रोन तंत्रज्ञान इराणकडून मिळाले होते. हे ड्रोन इराणचे अबाबील ड्रोनची कॉपी म्हटले जाते. हमास आणि इस्त्रायलमध्ये 10 मे पासून संघर्ष सुरु झाला होता. जवळपास 11 दिवस हल्ले सुरु होते. यामध्ये 200 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला असून 11 इस्त्रायलचे नागरिक आहेत. 

टॅग्स :Israelइस्रायलPalestineपॅलेस्टाइनwarयुद्ध