शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 12:15 IST

गैर मुसलमानांनी मुस्लिमांविरोधात फूट पाडा आणि राज्य करा असा फॉर्म्युला तयार केला आहे. ते सातत्याने हे काम करत आहेत. त्यात त्यांना यश मिळत आहे असा आरोप पाकिस्तानी खासदाराने केला.

पाकिस्तानी संसदेत खासदार मुजाहिद अली यांनी नकळत पाकिस्तानी सैन्य आणि आयएसआयचा बुरखा फाडला आहे. पडद्यामागे ISI आणि त्यांच्या जिहादी मानसिकतेवाले लोक जिहाद आणि गजवा ए हिंदला प्रोत्सहन देत असल्याचं पुढे आले. मुजाहिद अली यांनी उघडपणे संसदेत हिंदू, ईसाई, यहूदी यांच्या नरसंहाराचे समर्थन केले. खासदाराच्या या भाषणावर इतरांनी टाळ्या वाजवून त्यांना पाठिंबा दिला. गुरुवारी १९ जून रोजी पाकिस्तानी संसदेत खासदार मुजाहिद अली यांनी हे चिथावणीखोर भाषण केले. ज्यात त्यांनी गजवा ए हिंदचा उल्लेख केला. त्यांनी धार्मिक ग्रंथाचा हवाला देत हिंदू, यहुदी आणि ईसाईंना टार्गेट करण्याची भाषा केली.

मुजाहिद अली यांनी म्हटलं की, गैर मुसलमानांनी मुस्लिमांविरोधात फूट पाडा आणि राज्य करा असा फॉर्म्युला तयार केला आहे. ते सातत्याने हे काम करत आहेत. त्यात त्यांना यश मिळत आहे. परंतु आपल्या धार्मिक ग्रंथात इस्लाम धर्माचे रक्षण करण्यास सांगितले आहे. त्यासाठी मुस्लिमांची एक सभा खुरासान येथे होईल. जे इराणमधील एका शहराचे नाव आहे आणि अफगाणिस्तानाचेही जुने नाव आहे. तिथून काळी पगडी घालून लोक उठतील आणि धर्माचे रक्षण करतील. हदीसमध्येही याचे पुरावे आहेत. मुसलमान गैर मुस्लीम यहुदी आणि ईसाईंवर विजय मिळवतील असेही त्यांत सांगण्यात आल्याचे ते म्हणाले.

पाकिस्तान इस्लामी जगताचे मुख्यालय - मुजाहिद अली

पाकिस्तान इस्लामी जगताचे मुख्यालय आहे. इथे सर्वात चांगले कॅम्प आहे. ज्याप्रकारे आपल्या वायूसेनेने भारताला उत्तर दिले. ज्यारितीने पलटवार केला ते कौतुकास्पद होते. पण मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो, ताकदीच्या बाबतीत आपली भारताशी कोणतीही स्पर्धा नाही, पण कलमाची ताकद अशी आहे की त्याचे वजन अणुबॉम्बपेक्षा जास्त आहे. जेव्हा आपले सैन्य शत्रूसमोर उभे राहते, तेही जेव्हा शत्रू हिंदू असतो, तेव्हा त्यांचा आत्मविश्वास काही वेगळाच असतो असं त्यांनी सांगितले. 

दरम्यान, अलीकडेच पाकिस्तान सैन्याचे फिल्ड मार्शल असीम मुनीर यांनी अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांची व्हाईट हाऊसमध्ये भेट घेतली. ही भेट जवळपास २ तास चालली. या बैठकीत इराण-इस्त्रायल युद्धावर चर्चा करण्यात आली. त्यात इराणवर हल्ला करण्यासाठी अमेरिकन सैन्य दलाला पाकिस्तानातील एअरबेस वापरण्यास देण्यावर मुनीर यांनी सहमती दर्शवल्याचे बोलले जाते. इराण-इस्त्रायल यांच्यात संघर्ष शिगेला पोहचला असताना ही भेट झाल्याने अनेक चर्चांना उधाण आले आहे. 

टॅग्स :Pakistanपाकिस्तानMuslimमुस्लीमHinduहिंदूIranइराणIsraelइस्रायल