जी-20; काळ्या पैशाचा मुद्दा मांडणार

By Admin | Updated: November 15, 2014 02:45 IST2014-11-15T02:45:15+5:302014-11-15T02:45:15+5:30

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलियात पोहोचले असून, येथे शनिवारी सुरू होणा:या जी -2क् परिषदेत ते काळ्या पैशाचा मुद्दा आग्रहाने मांडतील असे अपेक्षित आहे.

G-20; Black money issue issue | जी-20; काळ्या पैशाचा मुद्दा मांडणार

जी-20; काळ्या पैशाचा मुद्दा मांडणार

ब्रिस्बेन : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी ऑस्ट्रेलियात पोहोचले असून, येथे शनिवारी सुरू होणा:या जी -2क् परिषदेत ते काळ्या पैशाचा मुद्दा आग्रहाने मांडतील असे अपेक्षित आहे. भारतात काळा पैसा उघड करण्याचे प्रय} चालले असताना, मोदी या व्यासपीठावर काळा पैसा उघडकीस आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय सहकार्याचा मुद्दा मांडतील. 
माजी पंतप्रधान राजीव गांधी 1986 साली ऑस्ट्रेलियात आले होते, त्यानंतर 28 वर्षानी ऑस्ट्रेलियाला भेट देणारे मोदी हे पहिले पंतप्रधान आहेत. त्यांच्या 1क् दिवसांच्या तीन देशांच्या दौ:यातील हा दुसरा टप्पा असून, ऑस्ट्रेलियात मोदी पाच दिवस राहणार आहेत. 
ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबेराला ते भेट देतील, तिथे ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी अॅबॉट यांना ते मंगळवारी भेटतील
 दोन दिवसांच्या जी-2क् परिषदेत जगातील सर्व विकसित व उदयमान देशांचे नेते उपस्थित असतील. भारताचा रोजगारवाढ विरहित   आर्थिक विकास ही एक चिंता असून त्याचाही उल्लेख विविध जागतिक नेत्यांशी संवाद साधताना केला जाईल.  
मोदींकडून विद्याथ्र्याना शुभेच्छा 
ऑस्ट्रेलियात पंतप्रधान मोदी यांचा पहिला कार्यक्रम क्वीन्सलँड विद्यापीठात होता. विद्यापीठातील विद्याथ्र्यामध्ये मोदी मोकळेपणाने मिसळले.
 भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची आज जयंती आहे आणि भारतात हा दिवस बालदिन म्हणून साजरा केला जातो, असे सांगून मोदी यांनी सर्व मुलांना शुभेच्छा दिल्या. 
भारताचा चुकीचा नकाशा
 मोदी यांच्या ऑस्ट्रेलिया दौ:यात त्यांनी येथील प्रसिद्ध क्वीन्सलँड विद्यापीठाला भेट दिली. या भेटीच्या कार्यक्रमात जो भारताचा नकाशा तिथे लावण्यात आला, त्यातून काश्मीर गायब होते. त्याबद्दल परराष्ट्र सचिव सुजाता सिंग यांनी तीव्र आक्षेप घेतला. या आक्षेपानंतर संयोजकांनी त्वरित माफी मागितली. परराष्ट्र मंत्रलयाचे प्रवक्ते सईद अकबरुद्दीन यांनी टि¦टरवर ही माहिती दिली.  (वृत्तसंस्था)
 
 

 

Web Title: G-20; Black money issue issue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.