शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने इतिहास घडवला! महिलांनी केवळ विश्वचषक नव्हे, तर भारतीयांचे हर'मन' ही जिंकले !
2
१९८३ चा क्षण महिला संघाने जिवंत केला! सचिन तेंडुलकरकडून टीम इंडियाचे कौतुक करत 'प्रेरणादायी' पोस्ट
3
आजचे राशीभविष्य,०३ नोव्हेंबर २०२५: इतरांचे भले करण्याच्या नादात संकटे येतील; पदोन्नती, व्यापारी सौदे यशस्वी
4
आता रिक्षा, टॅक्सी, बससाठी लागेल स्वतंत्र पार्किंग; राज्य परिवहन विभागाचे नवे धोरण
5
विशेष लेख: दुबार मतदार, मतचोरी आरोपावर भाजप नेते बोलतात, निवडणूक आयोग का बोलत नाही..?
6
'बाहुबली'ने उचलला ४,४१० किलोचा भार, सर्वात जड उपग्रहाला पाठवले अवकाशात
7
मंत्री बंगल्यावरील कामात कोट्यवधीच्या भ्रष्टाचारावर माेहाेर; चौकशीत अभियंते दोषी
8
लेख: एकीकडे शांततेच्या गप्पा, दुसरीकडे अणुबॉम्ब परीक्षण! डोनाल्ड ट्रम्प यांचा खरा चेहरा उघड
9
‘परिवहन’ची मंजुरी इलेक्ट्रिकला अन् सुसाट धावतात पेट्रोल बाइक टॅक्सी; कारवाईला ठेंगा
10
अग्रलेख: ‘सत्या’च्या मोर्चात ‘महा-मनसे’! मविआ + राज ठाकरे : शक्तिप्रदर्शन अर्थातच मोठे !!
11
महापौर आमचाच होऊ दे; उद्धव ठाकरे यांचे महोत्सवात देवाला गाऱ्हाणे; कार्यकर्त्यांना सल्ला
12
पॅलेस्टाइन-इस्रायल युद्धाच्या झळांनी होरपळलेले नागरिक आणि ‘कलिंगड’ आइस्क्रीम!
13
कोस्टल रोड वाहतुकीसाठी २४ तास खुला; पण अंधारातून प्रवास असल्याने अपघाताचा धोका वाढला !
14
बांगलादेशींच्या मुद्द्यावरून आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी; पालिका निवडणुकीमुळे वातावरण तप्त
15
विशेष लेख: शेतकऱ्यांना कर्जमुक्ती नाही, तर आम्ही थांबणार नाही; हा एल्गार थांबणार नाही..!!
16
Womens World Cup Final:'वाइल्ड कार्ड' एन्ट्रीसह आली अन् बॅटिंगनंतर बॉलिंगमध्येही 'ट्रम्प कार्ड' ठरली (VIDEO)
17
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
18
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
19
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
20
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!

भारतात WANTED असलेला फरार इस्लामिक धर्मगुरू झाकिर नाईक पाकिस्तानात 'पाहुणा'

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2024 17:03 IST

Zakir Naik in Pakistan, Wanted in India: पाकिस्तानातील तीन शहरांमध्ये झाकीर नाईक स्वत:च्या मुलासोबत करणार जाहीर कार्यक्रम

Zakir Naik in Pakistan, Wanted in India: आपल्या वादग्रस्त विधानांमुळे नेहमीच चर्चेत राहणारा इस्लामिक धर्मगुरू झाकीर नाईक याला पाकिस्तानने निमंत्रण दिले आहे. भारतात झाकीर नाईकवर UAPA अंतर्गत मनी लाँड्रिंग आणि प्रक्षोभक भाषणे केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर झाकीर नाईकने मलेशियात पलायन केले होते. आता पाकिस्तानकडून मिळालेल्या निमंत्रणाची माहिती खुद्द झाकीर नाईकनेच दिली आहे. एका टॉक शो साठी पाकिस्तानात प्रमुख पाहुणा म्हणून त्याला आमंत्रित करण्यात आले आहे.

पाकिस्तानात तीन ठिकाणी कार्यक्रम

झाकीर नाईकने त्याच्या सोशल मीडिया हँडलवर एक पोस्टर शेअर केली आहे. त्याने लिहिले आहे की, तो स्वत: आणि त्याचा मुलगा पाकिस्तानच्या तीन शहरांमध्ये भाषण करणार आहेत. ते दोघे ५-६ ऑक्टोबरला कराचीमध्ये, १२-१३ ऑक्टोबरला लाहोरमध्ये आणि १९-२० ऑक्टोबरला इस्लामाबादमध्ये पाकिस्तानी जनतेला संबोधित करतील.

भारतात परत येण्याबद्दल झाकीर नाईक काय म्हणाला?

अलिकडेच झाकीर नाईकने भारतात परतण्याबद्दल, त्याच्यावरील आरोपांबाबत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींबद्दल एका पाकिस्तानी यू-ट्युबरच्या पॉडकास्टमध्ये बोलला. भारतात झालेल्या आरोपांमुळे आणि अटकेच्या भीतीमुळे झाकीर नाईक २०१६ मध्ये भारतातून मलेशियाला गेला होता. नाईक भारतात परतण्याबाबत कुत्सितपणे बोलला की, भारतात जाणे खूप सोपे आहे, पण तेथून बाहेर पडणे अवघड आहे. मी भारतात गेल्यावर रेड कार्पेट अंथरले जाईल आणि मला 'आत ये, तुरुंगात बस' असे सांगितले जाईल. मी भारताच्या यादीतील पहिल्या क्रमांकाचा दहशतवादी आहे.

पंतप्रधान मोदींबाबतही विधान

दरम्यान, झाकीर नाईक असेही म्हणाला की, माझ्यावर अनेक आरोप झालेत पण एकही आरोप सिद्ध झालेला नाही. तसेच, पीएम मोदींबद्दल बोलताना तो म्हणाला की, आतापर्यंतच्या एकूण कारकिर्दीत मोदींची सुरूवातीची १० वर्षे खूप चांगली होती, पण २०२४च्या लोकसभा निवडणुकीत त्यांची लोकप्रियता कमी झाली आहे.

 

टॅग्स :Zakir Naikझाकीर नाईकIslamइस्लामYouTubeयु ट्यूबprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी