शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

55 वर्षांचा फ्रेंच स्पायडरमॅन दक्षिण कोरियातील पोलिसांच्या जाळ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2018 13:00 IST

रॉबर्टने आजवर 100 हून अधिक उंच इमारतींवर दोरी व इतर साहित्याविना चढाई केली आहे. कोणत्याही मदतीविना सर्वाधीक इमारती चढून गेल्याबद्दल त्याची नोंद गिनेस बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झाली आहे.

सेऊल- फ्रान्समध्ये स्पायडरमॅन म्हणून ओळखला जाणाऱ्या अलेन रॉबर्टला दक्षिण कोरियामध्ये अटक करण्यात आलेली आहे. कोणत्याही साधनांविना इमारतींवर चढून जाणारा या रॉबर्टने सेऊलमधील 123 मजल्यांची लोटे वर्ल्ड टॉवर ही इमारत चढण्याचा प्रयत्न केला मात्र कोरियातील पोलिसांनी त्याला मध्येच उतरणे भाग पाडले. इमारतीच्या देखभाल करणाऱ्या क्रेनमधून त्याला गच्चीवर नेण्यात आले आणि मग त्याला अटक केली गेली.55 वर्षांच्या रॉबर्टला फ्रेंच स्पायडरमॅन म्हणून ओळखले जाते. दोरी किंवा कोणत्याही साहित्याशिवाय इमारतींवर चढून जाणे या त्याच्या सवयीमुळे तो प्रसिद्ध आहे. पण कोरियामध्ये मात्र त्याला हे करण्यापासून रोखण्यात आले. त्याला पोलिसांनी अटक केल्यावर वृत्तसंस्थेशी बोलताना तो म्हणाला, मी जवळजवळ 75 मजले चढून गेलो होतो मात्र पोलीस मला रोखू लागले, नंतरनंतर तर तो उंदिर-मांजराचा खेळच झाला म्हणून मी पोलिसांना शरण जाण्याचा निर्णय घेतला. मी हे सगळं उत्तर आणि दक्षिण कोरियामध्ये संवादाचे वारे वाहात आहे त्याच्या आनंदाप्रित्यर्थ केलं. उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन आणि दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष मून जाए इन यांना धन्यवाद देण्याचा हा माझा मार्ग आहे.

रॉबर्टने आजवर 100 हून अधिक उंच इमारतींवर दोरी व इतर साहित्याविना चढाई केली आहे. कोणत्याही मदतीविना सर्वाधीक इमारती चढून गेल्याबद्दल त्याची नोंद गिनेस बूक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्येही झाली आहे.

आयफेल टॉवर, सीडनीचे ऑपेरा हाऊस, मलेशियाचे पेट्रोनॉस टॉवर, दुबईतील बुर्ज खलिफा अशा इमारती त्याने कोणत्याही साधनाच्या मदतीशिवाय चढण्याचा विक्रम केला आहे. या उद्योगात रॉबर्ट अनेकवेळा जखमी झाला असून त्याला वारंवार दुखापत झाली असून, त्याला अनेकवेळा अटकही झाली आहे. कोणत्याही परवानगीविना त्याने लोटे वर्ल्ड टॉवर चढण्याचा प्रयत्न केला ही अत्यंत खेदाची बाब असल्याचे या संकुलाच्या प्रवक्त्याने सांगितले. 

टॅग्स :South Koreaदक्षिण कोरियाInternationalआंतरराष्ट्रीयPoliceपोलिस