इसिसला संपवणारच - फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष होलांद

By Admin | Updated: November 17, 2015 10:13 IST2015-11-17T10:04:10+5:302015-11-17T10:13:52+5:30

फ्रान्स इसिसला संपवण्यासाठी कटीबद्ध आहे असे सांगत या कामात अमेरिका व रशियाने एकत्र येऊन मोहीमेत सहभागी व्हावे असे आवाहन फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्स फ्रँकस होलांद यांनी केले आहे.

French President Francois Holland | इसिसला संपवणारच - फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष होलांद

इसिसला संपवणारच - फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष होलांद

ऑनलाइन लोकमत 

पॅरिस, दि. १७ - फ्रान्स इसिसला संपवण्यासाठी कटीबद्ध आहे असे सांगत या कामात अमेरिका व रशियाने एकत्र येऊन मोहीमेत सहभागी व्हावे असे आवाहन फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रान्स फ्रँकस होलांद यांनी केले आहे. 

पॅरिसमधील इसिसच्या दहशतवाद्यांनी घडवलेल्या नरसंहाराने फ्रान्स हादरला असून इसिसविरोधात फ्रान्सने मोहीमच उघडली आहे. सीरियातील राक्का येथील इसिसच्या अड्ड्यांवर फ्रान्सने हवाई हल्ले केले आहेत. सोमवारी फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष फ्रँकस होलांद यांनी इसिसविरोधात युद्धच पुकारले. होलांद म्हणाले सीरिया प्रश्नावर जागतिक स्तरावर एकमत होणे गरजेचे असून दहशतवाद्यांनी कारवाई झाली पाहिजे. सीरिया ही दहशतवादाची फॅक्टरी बनली असून फ्रान्स इसिसला संपवण्यासाठी कटीबद्ध आहे असे त्यांनी सांगितले.  

Web Title: French President Francois Holland