शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

पैगंबर मोहम्मदांच्या कार्टूनसंदर्भातील वादावर जस्टिन ट्रूडोंचं भाष्य, प्रत्येक गोष्टीची एक सीमा असते!

By श्रीकृष्ण अंकुश | Updated: November 1, 2020 16:03 IST

फ्रान्समधील व्यंग्यचित्र मॅगझीन शार्ली हेब्दोमध्ये छापल्या गेलेल्या पैगंबर मोहम्मदांच्या व्यंगचित्रावरून (cartoons) ट्रुडो यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ट्रुडो म्हणाले...

ठळक मुद्देकॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी इस्लामिक कट्टरता आणि अभिव्यक्ती स्वतंत्र्यासंदर्भात आपले मत व्यक्त केले आहे. पंतप्रधान ट्रूडो यांनी शुक्रवारी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा बचाव केला. मात्र याच बरोबर, याला एक सीमा असते असेही त्यांनी म्हटले आहे.कुठल्याही समाजाच्या भावना जाणूनबुजून दुखावणे चुकीचे असल्याचेही कॅनाडाचे पंतप्रधान ट्रुडो यांनी म्हटले आहे. 

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी इस्लामिक कट्टरता आणि अभिव्यक्ती स्वतंत्र्यासंदर्भात आपले मत व्यक्त केले आहे. पंतप्रधान ट्रूडो यांनी शुक्रवारी अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा बचाव केला. मात्र याच बरोबर, याला एक सीमा असते असेही त्यांनी म्हटले आहे. याशिवाय, कुठल्याही समाजाच्या भावना जाणूनबुजून दुखावणे चुकीचे असल्याचेही कॅनाडाचे पंतप्रधान ट्रुडो यांनी म्हटले आहे. 

फ्रान्समधील व्यंग्यचित्र मॅगझीन शार्ली हेब्दोमध्ये छापल्या गेलेल्या पैगंबर मोहम्मदांच्या व्यंगचित्रावरून (cartoons) ट्रुडो यांना प्रश्न विचारण्यात आला होता. यावर ट्रुडो म्हणाले, आम्ही नेहमीच अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा बचाव करू. मात्र, अभिव्यक्ती स्वातंत्र्यालाही एक सीमा आहे. आपण इतरांचा सन्मान करायला हवा. तसेच ज्यांच्यासोबत आपण हा समाज आणि भूभाग शेअर करत आहोत त्यांना जाणूनबुजून दुखवू नये. 

मुस्लिमांना फ्रान्सच्या लाखो नागरिकांना मारण्याचा पूर्ण अधिकार; मलेशियाचे माजी PM महातिर मोहम्मद यांचं प्रक्षोभक वक्तव्य ट्रुडो म्हणाले, आपण आपल्या स्वातंत्र्याच्या नावाखाली दहशत निर्माण करू शकत नाही. प्रत्येक गोष्टीला एक मर्यादा असते. ते म्हणाले बोलण्याच्या स्वातंत्र्याचा सतर्कतेने वापर व्हायला हवा. तर, फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युअल मॅक्रॉन यांनी पैगंबर मोहम्मदांचे व्यगचित्र छापण्याच्या निर्णयाचा जोरदार बचाव केला होता. एवढेच नाही, तर काही झाले तरी आपण झुकणार नाही, असे मॅक्रॉन यांनी म्हटले होते.

तत्पूर्वी, फ्रान्सच्या नीस शहरातील चर्चमध्ये गुरुवारी झालेल्या हल्ल्यात तील जणांचा मृत्यू झाला होता. यानंतर संबंधित हल्लेखोर ट्यूनिशियाचा नागरिक असल्याचेही समोर आले होते. हल्ल्यानंतर या हल्लेखोराला अटक करण्यात आली होती. कॅनडाच्या संसदेत गुरुवारी पीडितांसाठी एक मिनिटांचे मौन पाळले. तसेच, कॅनडा फ्रान्समध्ये झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो आणि या कठीन परिस्थितीत आपल्या फ्रेंच मित्रांसोबत उभा आहे, असेही ट्रुडो यांनी म्हटले होते.

"नेहमी एकाच समाजाचे लोक आग का लावतात?;" भोपाळमधील मुस्लीम रॅलीवर बाबा रामदेव म्हणाले...

फ्रान्समध्ये गेल्या महिन्यातच क्लासरूममध्ये पैगंबर मोहम्मदांचे व्यंगचित्र दाखवणाऱ्या एका शिक्षकाचीही हत्या झाली होती. हा इस्लामिक दहशतवादी हल्ला असल्याचे मॅक्रॉन यांनी म्हटले होते. फ्रान्सच्या राष्ट्रपतींच्या या वक्तव्यावर अनेक देशांतून टीकाही झाली होती. तसेच त्यांचे हे वक्तव्य इस्लामोफोबिया वाढवणारे असल्याचे म्हटले गेले होते. एवढेच नाही, तर फ्रान्सच्या वस्तूंवर बहिष्कार टाकण्याचे आवाहनही करण्यात आले होते.

Nice Attack: हातात कुराण अन् चाकू घेऊन चर्चमध्ये घुसला हल्लेखोर; ३ जणांना केलं ठार

टॅग्स :Justin Trudeauजस्टीन ट्रुडोCanadaकॅनडाFranceफ्रान्सIslamइस्लामMuslimमुस्लीम