शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

भारताची अण्विक ताकद वाढवण्यासाठी फ्रान्स देणार साथ; 'Veto Power' मिळण्यासाठीही समर्थन

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2022 13:49 IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी घेतली फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रों (Emanuel Macron) यांची भेट.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या फ्रान्स दौऱ्यात फ्रान्सने अणू पुरवठादार गटात (NSG) भारताच्या समावेशासाठी आपल्या समर्थनाचा पुनरुच्चार केला. एनएसजीमध्ये सामील होऊन भारताची अण्विक ताकद झपाट्याने वाढण्याची अपेक्षा आहे. त्याच वेळी, दुसरीकडे भारत आणि फ्रान्सने G20 मसुद्याअंतर्गत मजबूत सहकार्य कायम ठेवण्याचेही मान्य केले आहे. NSG मध्ये सामील होण्याच्या आपल्या प्रयत्नांवर निर्णय घेण्यासाठी सदस्य देशांशी चर्चा करणार असल्याचे भारताने म्हटले.

दरम्यान पंतप्रधान मोदी आणि मॅक्रों यांच्यात द्विपक्षीय आणि जागतिक मुद्द्यांवर विस्ताराने चर्चा झाली. तसंच भारत फ्रान्स रणनितीक करारासाठी पुढील टप्प्यासाठी एका अंजेंड्यावर सहमतीही झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत यासंदर्भातील माहिती दिली. याशिवाय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अरिंदम बागची यांनीही या भेटीबाबत ट्विट करत भारत-फ्रान्स भागीदारी शांतता, प्रगती आणि समृद्धीसाठी एक शक्ती असल्याचे म्हटले आहे. NSG मध्ये ४८ देशांचा समावेश आहे जे आण्विक तंत्रज्ञान आणि आण्विक सामग्रीच्या व्यापार आणि हस्तांतरणावर नियंत्रण ठेवतात, तसेच अण्वस्त्रांच्या अप्रसारामध्ये सहकार्य करतात. भारताच्या NSG मध्ये सामील होण्यास चीनचा विरोध आहे. चीनच्या विरोधामुळे भारताला या गटात सामील होणे कठीण झाले आहे. याशिवाय फ्रान्सने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषद (UNSC) मध्ये सुधारणा करण्याच्या प्रयत्नांना आणि भारताच्या स्थायी सदस्यत्वाला पाठिंबा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्रों यांच्या भेटीनंतर जारी करण्यात आलेल्या संयुक्त निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे.

भारत दीर्घकाळापासून सुरक्षा परिषदेत सुधारणांची मागणी करत आहे आणि भारत संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा स्थायी सदस्य होण्यास पात्र आहे. सुरक्षा परिषदेत पाच स्थायी सदस्य आहेत. रशिया, चीन, ब्रिटन, फ्रान्स आणि अमेरिका हे त्याचे स्थायी सदस्य आहेत. केवळ या स्थायी सदस्यांकडेच व्हिटो पॉवर आहे. याद्वारे कोणताही निर्णय होऊ देणं किंवा होऊ न देण्याचा अधिकार मिळतो.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीFranceफ्रान्सIndiaभारत