फ्रान्समध्ये चर्चवर हल्ला, एक बंधक ठार
By Admin | Updated: July 26, 2016 15:49 IST2016-07-26T15:43:42+5:302016-07-26T15:49:46+5:30
फ्रान्सच्या नीस शहरात दहशतवादी हल्ला झाल्याची घटना ताजी असताना मंगळवारी रॉयून शहरातील एका चर्चवर दोन हल्लेखोरांनी हल्ला केला.

फ्रान्समध्ये चर्चवर हल्ला, एक बंधक ठार
ऑनलाइन लोकमत
पॅरिस, दि. २६ - फ्रान्सच्या नीस शहरात दहशतवादी हल्ला झाल्याची घटना ताजी असताना मंगळवारी रॉयून शहरातील एका चर्चवर दोन हल्लेखोरांनी हल्ला केला. हल्लेखोरांनी चाकूचा वापर करुन चर्चमध्ये काही जणांना बंधक बनवून ठेवले होते. पोलिस कारवाई दरम्यान दोन्ही हल्लेखोर ठार झाले आहेत.
एक बंधकाचाही मृत्यू झाला आहे. हल्लेखोरांची ओळख आणि उद्देश अजून स्पष्ट झालेला नाही. त्यामुळे याला आताच दहशतवादी हल्ला म्हणता येणार नाही. फ्रान्समध्ये अतिसर्तकतेचा इशारा असताना पुन्हा हल्ला झाला आहे.
आणखी वाचा
मागच्या आठवडयात फ्रान्सच्या राष्ट्रीय दिनी नीस शहरात दहशतवादी हल्ला झाला होता. यावेळी हल्लेखोराने आतषबाजी पाहण्यासाठी जमलेल्या गर्दीला ट्रकखाली चिरडले होते. यात ८४ जण ठार झाले.