फॉक्सच्या स्पोटर्स रिपोर्टरने जिंकला न्यूड चित्रीकरणाविरोधातला खटला
By Admin | Updated: March 8, 2016 18:03 IST2016-03-08T18:03:04+5:302016-03-08T18:03:04+5:30
फॉक्सची स्पोटर्स रिपोर्टर एरिन अॅड्रयूजने अखेर न्यूड व्हिडीओ चित्रीकरणाविरोधात अमेरिकेतील न्यायालयात दाखल केलेला खटला जिंकला आहे.

फॉक्सच्या स्पोटर्स रिपोर्टरने जिंकला न्यूड चित्रीकरणाविरोधातला खटला
ऑनलाइन लोकमत
न्यूयॉर्क, दि. ८ - फॉक्सची स्पोटर्स रिपोर्टर एरिन अॅंड्रयूजने अखेर न्यूड व्हिडीओ चित्रीकरणाविरोधात अमेरिकेतील न्यायालयात दाखल केलेला खटला जिंकला आहे. डेविडसन काऊंटी सर्कीट कोर्टाने एरिनला नुकसानभरपाई म्हणून साडेपाच कोटी डॉलर देण्याचे आदेश दिले आहेत.
नॅशविले येथील वेस्ट एन्ड हॉटेल आणि दोषी मायकल डेविड बॅरेटाकडून ही नुकसानभरपाई वसूल करण्यात येणार आहे. मायकल डेविड बॅरेटाने सप्टेंबर २००८ मध्ये नॅशविले येथील हॉटेल रुममध्ये एरिनचा साडेचार मिनिटांचा न्यूड व्हिडीओ चित्रीत केला होता. त्याने एरिन ज्या रुममध्ये थांबली होती. त्या रुमच्या शेजारची खोली बुक केली होती. मायकलने तो व्हिडीओ नंतर इंटरनेटवर अपलोड केल्यामुळे व्हायरल झाला.
या व्हिडीओमुळे आपल्याला अत्यंत वाईट अनुभवातून जावे लागले. मी डिप्रेशनमध्ये गेले होते असे एरिनने न्यायालयाला सांगितले. एफबीआयच्या तपासात तो व्हीडीओ मायकल डेविडने चित्रीत केल्याचे समोर आले. एरिनने नुकसानभरपाईचा खटला दाखल करताना हॉटेललाही जबाबदार धरले होते. न्यायालयाने तिचा हा मुद्दा मान्य केला. मायकल डेविडला या प्रकरणात अडीचवर्षाची शिक्षाही झाली आहे.