अमेरिकेतील गोळीबारात ४ जण ठार
By Admin | Updated: March 24, 2017 00:28 IST2017-03-24T00:28:15+5:302017-03-24T00:28:15+5:30
उत्तर विस्कॉन्सिनमध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या. यात एका पोलीस अधिकाऱ्यासह चार जण ठार

अमेरिकेतील गोळीबारात ४ जण ठार
वेस्टन (अमेरिका) : उत्तर विस्कॉन्सिनमध्ये तीन वेगवेगळ्या ठिकाणी गोळीबाराच्या घटना घडल्या. यात एका पोलीस अधिकाऱ्यासह चार जण ठार झाले. पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. मात्र, संशयीत तसेच पीडितांची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही.
एक बँक, एक विधि प्रतिष्ठान आणि एका अपार्टमेंटमध्ये बुधवारी गोळीबाराच्या घटना घडल्या. विशेष पथकाचे अधिकारी आणि संशयीत यांच्यात पाठशिवणीचा खेळ सुरू होता. आता लोकांन धोका असल्याचे अधिकाऱ्यांनी नंतर सांगितले. या घटनेबाबतची अधिक माहिती लवकरच दिली जाईल, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. (वृत्तसंस्था)
बगदादीचा कधीही खात्मा
इस्लामिक स्टेटचा नेता अबू बकर अल-बगदादी लवकरच मारला जाईल, असे अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री रेक्स टिलरसन म्हणाले. बगदादीचे जवळपास सर्वच साथीदार मारले गेले आहेत. तो कोणत्याही क्षणी मृत्यूच्या दाढेत जाऊ शकतो, असे ते म्हणाले.