शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
2
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
3
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
4
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
5
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
6
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
7
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
8
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
9
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
10
व्हॅटिकन VS व्हाईट हाऊस: "मी घाबरत नाही...!" ट्रम्प यांच्या विधानावर पोप लियो XIV यांचा थेट पलटवार; प्रकरण काय?
11
IPL 2026, SRH vs RR : ईशानचा 'शानदार' शो! वैभव सूर्यवंशीला केलं ओव्हरटेक; काव्या मारनने अशी दिली दाद
12
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार, १५ एप्रिल रोजी बिहारला नवा मुख्यमंत्री मिळणार...
13
होर्मुझमधून जाणाऱ्या भारतीय जहाजांकडून कोणताही टोल घेतला नाही; इराणची स्पष्टोक्ती...
14
SRH vs RR : जोफ्राचा कहर! अभिषेक शर्मावर 'गोल्डन डक'ची नामुष्की; नको तिथं रोहित-संजूला टाकलं मागे
15
'अमिरों का नशे'मुळे तपास यंत्रणांमध्ये खळबळ, महागड्या 'कोकेन'ची नागपूर मार्गे नियमित तस्करी 
16
'पतसंस्थेतील बँक खाती बनावट, सह्या सुद्धा खोट्या'; प्रतिभा चाकणकर पहिल्यांदाच अशोक खरात प्रकरणावर बोलल्या
17
"आमच्यात नाक खुपसू नका", डोनाल्ड ट्रम्प यांना दिला इशारा, इराणच्या बाजूने उभा राहिला चीन
18
अमेरिकेच्या नाकेबंदीमुळे १५ भारतीय जहाजे होर्मुझमध्ये अडकली; मदतीसाठी नौदलाची धाव...
19
बहिणीला शिवीगाळ, बोअरवेल कामगार विजय पानसेची धारदार शस्त्राने वार करत हत्या, सांगली जिल्ह्यातील घटना 
20
Latest Marathi News LIVE: नागपुरात ४.२६ कोटींचे कोकेन जप्त, राजधानी एक्स्प्रेसमध्ये मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

Death in Canada US Border: कॅनडा-अमेरिकेच्या सीमेवर भीषण थंडीत गोठून चार भारतीयांचा मृत्यू, धक्कादायक कारण आलं समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2022 22:07 IST

Human Smuggling on Canada US Border: अमेरिका आणि कॅनडाच्या सीमेवर एकाच कुटुंबातील चार व्यक्तींचा कडाक्याच्या थंडीमुळे गारठून मृत्यू झाला. मृतांमध्ये एका नवजात बाळाचाही समावेश आहे. अमेरिकन पोलिसांनी ही घटना मानवी तस्करीशी संबंधित असल्याचे म्हटले आहे.

वॉशिंग्टन - अमेरिका आणि कॅनडाच्या सीमेवर एकाच कुटुंबातील चार व्यक्तींचा कडाक्याच्या थंडीमुळे गारठून मृत्यू झाला. मृतांमध्ये एका नवजात बाळाचाही समावेश आहे. अमेरिकन पोलिसांनी ही घटना मानवी तस्करीशी संबंधित असल्याचे म्हटले आहे. मिळालेल्या माहितीनुसार सर्व मृतक हे भारतातून आले होते. तसेच कॅनडामधून अमेरीकेच्या सीमेमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. यादरम्यान हवामान बिघडल्यामुळे बर्फाळ प्रदेशात थंडीमुळे त्यांचा मृत्यू झाला.

मेनटोबाच्या रॉयल कॅनेडियन माऊंटेन पोलिसांनी सांगितले की, एमर्सनच्या जवळ कॅनडा-अमेरिका सीमेवर कॅनडाच्या दिशेला बुधवारी चार मृतदेह सापडले. यातील दोघे प्रौढ, एक तरुण आणि एक नवजात बालक होते. आरसीएमपीचे सहाय्यक आयुक्त जेन मॅक्लेची यांनी सांगितले की, आज मी जी माहिती देणार आहे ती अनेक लोकांना ऐकणे धक्कादायक आहे. निश्चितपणे ही हृदयद्रावक दुर्घटना आहे. प्राथमिक तपासामध्ये या सर्वांचा मृत्यू हा अतिथंड हवामानामुळे झाल्याचे समोर आलं आहे.

मॅक्लेची याने सांगितले की, आरसीएमपीच्या मते चारही मृत हे अमेरिकेच्या सीमेत पकडण्यात आलेल्या एका गटाचा भाग होते. त्यांनी सांगितले की, चारही मृतदेह हे सीमेपासून नऊ ते १२ मीटर अंतरावर सापडले. मेनटोबा आरसीएमपीला अमेरिकेच्या सीमा शुल्क आणि सीमा सुरक्षा विभागाकडून  बुधवारी एमर्सनच्याजवळ लोकांचा एक गट सीमा पार करून अमेरिकेत आल्याची आणि एका प्रौढ व्यक्तीच्या हातात मुलांच्या उपयोगातील वस्तू आहे. मात्र समुहामध्ये नवजात बाळ नाही आहे, अशी माहिती मिळाली होती.

त्यानंतर सीमेच्या दोन्हीकडून शोधमोहीम सुरू झाली. शोधमोहिमेदरम्यान, दुपारी वयस्कर पुरुष, महिला आणि नवजात बाळाचे मृतदेह सापडले. तर एका तरुणाचा मृतदेह काही वेळाने सापडला. दरम्यान, डिस्ट्रिक्ट ऑफ मिनिसोटाच्या अमेरिकी अटॉर्नी कार्यालयाने गुरुवारी एक पत्रक काढून सांगितले की, या प्रकरणात मानवी तस्करीच्या आरोपीखाली फ्लोरिडामधील स्टीव्ह शेंड याला अटक करण्यात आली आहे. 

टॅग्स :United StatesअमेरिकाCanadaकॅनडाAccidentअपघातIndiaभारत