शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी केली आपल्यासोबत गंदी बात, अभिनेत्रीचा सनसनाटी आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2017 20:42 IST

अमेरिकी अभिनेत्री हेदर लिंड हिने अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांवर सनसनाटी आरोप केला आहे. अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांनी एका टीव्ही शो दरम्यान आपल्याला चुकीच्या पद्धतीने...

न्यूयॉर्क - अमेरिकी अभिनेत्री हेदर लिंड हिने अमेरिकेच्या माजी राष्ट्राध्यक्षांवर सनसनाटी आरोप केला आहे. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश (सीनियर) यांनी  एका टीव्ही शो दरम्यान आपल्याला चुकीच्या पद्धतीने हात लावून अश्लील विनोज ऐकवल्याचा आरोप तिने केला आहे. मात्र माजी राष्ट्राध्यक्षांच्या प्रवक्त्यांना हे आरोप फेटाळून लावले आहेत. माजी राष्ट्रपतींनी विनोद म्हणून असे केले, कुणाच्याही भावना दुखावण्याचा त्यांचा हेतू नव्हता. त्यांच्या कृतीमुळे जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर माजी राष्ट्राध्यक्ष माफी मागत आहेत, असे या प्रवक्त्याने म्हटले आहे.  34 वर्षी अभिनेत्री हेदर हिने मंगळवारी इंस्टाग्रामवर एक पोस्ट लिहून या घटनेबाबत सविस्तर माहिती दिली आहे. लिंड म्हणाली की, एका छायाचित्रात अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बराक ओबामा यांच्यासोबत 93 वर्षीय बुश यांना पाहून मला धक्का बसला. माजी राष्ट्रपतींना देण्यात येणाऱ्या सन्मानाची मला जाणीव आहे. या छायाचित्रात दिसणाऱ्या अनेक व्यक्तीबाबत मला गर्व आहे. चार वर्षांपूर्वी एका ऐतिहासिक टेलिव्हिजन कार्यक्रमाचे प्रमोशन करताना मला जॉर्ज बुश (सिनियर) यांना भेटण्याची संधी मिळाली होती. मात्र अशाच प्रकारच्या एका छायाचित्रासाठी पोझ देताना माझे लैंगिक शोषण झाले होते. आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिंड लिहिते,"त्यांनी माझ्यासोबत हस्तांदोलन केले नाही. ते व्हिलचेअरवर बसलेले होते. त्यांनी मला मागून स्पर्श केला. यादरम्यान, त्यांची पत्नी बार्बरा या सुद्धा त्यांच्यासोबत होत्या. दरम्यान बुश यांनी मला एक अश्लील विनोद ऐकवला. नंतर फोटो काढत असताना त्यांनी मला पुन्हा एकदा स्पर्श केला. ते पाहून बुश यांच्या पत्नीने त्यांच्याकडे कटाक्ष टाकला. नंतर त्यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेल्या सुरक्षा रक्षकांनी मी त्यांच्या एवढ्या जवळ उभे राहता कामा नये होते, असे सांगितले." याबाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार इतर महिलांना धैर्य दाखवून आपले अनुभव कथन करताना पाहून मी ही घटना सर्वांसमोर आणण्याचा निर्णय घेतला. गेल्या आठवड्यात अनेक अमेरिकी महिलांना हार्वे वाइंस्टाइन याच्यावर लैगिक शोषणाचे आरोप केले होते. तसेच अन्य अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शकांवरही आरोप झाले होते.  

टॅग्स :USअमेरिकाsexual harassmentलैंगिक छळWomenमहिला