बॉलिवूडमध्येही अभिनेत्रींचं होतं लैंगिक शोषण, प्रियंका चोप्राचा धक्कादायक खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2017 05:54 PM2017-10-20T17:54:33+5:302017-10-20T17:58:54+5:30

हॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते हार्वे वाइनश्टीन यांच्यावर 20पेक्षा अधिक अभिनेत्रींनी शारीरिक शोषण करत असल्याचा आरोप लावल्यानंतर आता विश्वसुंदरी प्रियंका चोप्रानं बॉलिवूडमध्येही असे प्रकार घडत असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे.

In Bollywood, the actress was sexually exploited, Priyanka Chopra's shocking disclosure | बॉलिवूडमध्येही अभिनेत्रींचं होतं लैंगिक शोषण, प्रियंका चोप्राचा धक्कादायक खुलासा

बॉलिवूडमध्येही अभिनेत्रींचं होतं लैंगिक शोषण, प्रियंका चोप्राचा धक्कादायक खुलासा

Next

नवी दिल्ली- हॉलिवूडमधील प्रसिद्ध निर्माते हार्वे वाइनश्टीन यांच्यावर 20पेक्षा अधिक अभिनेत्रींनी शारीरिक शोषण करत असल्याचा आरोप लावल्यानंतर आता विश्वसुंदरी प्रियंका चोप्रानं बॉलिवूडमध्येही असे प्रकार घडत असल्याचा धक्कादायक खुलासा केला आहे. मेरी क्लेअर पॉवर ट्रिप या कार्यक्रमात प्रियंका सहभागी झाली होती. त्यावेळी तिला हार्वे वेन्स्टाइनच्या लैंगिक शोषणाबाबत प्रश्न विचारण्यात आले.

ती म्हणाली, हार्वे वेन्स्टाइनच्या प्रवृत्तीची लोक सगळीकडेच आहेत. ही फक्त सेक्सपुरती मर्यादित गोष्ट नाही, खरंतर हा त्यांच्या क्षेत्रातील ताकदीचा विषय आहे. हे फक्त हॉलिवूडमधल्या हार्वे यांच्यापर्यंतच मर्यादित नाही, तर बॉलिवूडमध्येही असे प्रकार सर्रास घडत असतात. हार्वेसारखी लोक बॉलिवूडमध्येही आहेत, असंही प्रियंका म्हणाली आहे. हॉलिवूडमध्ये फक्त हार्वी वाइनश्टीन ही एकच व्यक्ती नाही, तर अशी माणसे जगभरात सापडतील. आमच्या क्षेत्रात कोणाचाही अहंकार दुखवायचा नसतो. पुरुषांचा अहंकार सांभाळला नाही तर आपलं करिअर नष्ट होईल, असे महिलांना वाटते किंवा यांना दुखावले तर ते आपल्याला क्षेत्रात एकटे पाडतील, अशी महिलांच्या मनात भीती असते. 

हॉलिवूडमधील अभिनेत्री एलिसा मिलानो हिनं माझ्यासोबतही असं घडलं आहे म्हणत #Me Too ट्विट केलं आणि हे ट्विट चांगलेच व्हायरल झालं. या कॅम्पेनला दुनियाभरातून महिलांचा सहभाग मिळतो आहे. या कॅम्पेनला आता मुंबई पोलिसांनीही पाठिंबा दिला आहे. मुंबई पोलिसांनी ट्विट करत या कॅम्पेनला पाठिंबा दिला आहे. शारीरिक शोषणाबद्दल लोक ऑनलाइन मत मांडतं आहेत. ही चांगली सुरूवात आहे. आता या तक्रारींवर आम्हाला ऑफलाइन कायदेशीर करून अजून चांगली सुरूवात करू द्या. असं ट्विट मुंबई पोलिसांनी केलं आहे. 

कोलकाता पोलिसांनीही दिला #MeToo कॅम्पेनला पाठिंबा
काही दिवसांपूर्वी कोलकाता पोलिसांनी फेसबुकवर पोस्ट शेअर करून कॅम्पेनला पाठिंबा दिला होता. कोलकाता पोलिसांनी त्यांच्या फेसबुक पोस्टमध्ये लैंगिक शोषणाच्या विरोधात महिलांनी मजबूत व्हावं, असं म्हटलं. तसंच या मुद्द्यावर पोलीस संतप्त असल्याचं त्यांनी पोस्टमध्ये नमूद केलं. लैंगिक शोषणाच्या प्रत्येक तक्रारावीर कठोर पाऊलं उचलणार असून दोषींवर कारवाई केली जाईल, असं पोलिसांनी म्हंटलं आहे. महिलांनी न घाबरता पोलिसांकडे तक्रार दाखल करावी, असंही कोलकाता पोलिसांनी म्हंटलं. 

काय आहे #Me Too
अभिनेत्री एलिसा मिलानो हिने शारीरिक शोषणाच्या प्रश्नाचे गांभीर्य जगासमोर येण्यासाठी ट्विट केलं. 'आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावर शारीरिक शोषण झालेल्या महिलांनी जर #Me Too लिहून स्टेटस शेअर केला, तर कदाचित स्त्रियांच्या शोषणाचा प्रश्न किती गंभीर आहे याची जाणीव लोकांना होईल,' असे ट्विट तिने केलं आणि जगभरातील महिला याविषयी आपली मतं मांडू लागल्या.

भारतातही ट्रेंडिंग
या कॅम्पेनमध्ये हॉलिवूडच्या अनेक कलाकारांनी आपल्याला आलेले अनुभव शेअर केले. भारतातही हा हॅशटॅग ट्रेंड झाला. फेसबुक, ट्विटरच्या माध्यमातून भारतातील अनेक मुली आपल्याला आलेले असे वाईट अनुभव लोकांसमोर मांडले.

Web Title: In Bollywood, the actress was sexually exploited, Priyanka Chopra's shocking disclosure

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.