शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काय चाललेय! एअर इंडियात पदावर एक, निर्णय घेतो भलताच; सरकारने एअर इंडियाला सुनावले...
2
Video - अमेरिकेत मोठी दुर्घटना टळली! टेकऑफ दरम्यान लँडिंग गियरला आग, विमानात होते १७९ जण
3
माणिकराव कोकाटेंना साडेसातीची झळ, शनिदेव तारणार की राजकरणातून ‘मुक्ती’ देणार? लवकरच कळेल!
4
‘धनुष्यबाण-घड्याळ’ वाटपात कौशल्य; महायुतीच्या कामी आल्याचे राहुल नार्वेकरांना बक्षीस मिळणार!
5
७ तासांपेक्षा कमी किंवा ९ तासांपेक्षा जास्त झोपता? लवकर मृत्यूचा धोका, रिसर्चमध्ये मोठा खुलासा
6
ती तरुणी ओळखीच्या दुकानदारासोबत एक रात्र होती; लोणावळ्यात तिघांनी अत्याचार करून कारमधून फेकल्याच्या घटनेवर मोठा खुलासा
7
हायव्होल्टेज ड्रामा! पोराला घेऊन बॉयफ्रेंडच्या घरी गर्लफ्रेंड; बायको म्हणते "माझा नवरा असा नाही, हीच..."
8
"मी एका मोठ्या सिनेमात फेल झालो", फहाद फाजिलने पुन्हा 'पुष्पा'वर केलं भाष्य; पुढे म्हणाला...
9
भयंकर! अचानक लिफ्ट बंद पडली, आवाज देण्यासाठी डोकं बाहेर काढताच...; व्यावसायिकाचा मृत्यू
10
पंतप्रधान नरेंद्र मोदीच पुन्हा जगात नंबर वन! सर्वाधिक लोकप्रिय लोकशाही नेत्यांमध्ये अव्वल
11
साप्ताहिक राशीभविष्य: ११ राशींना शुभ, चौफेर दुप्पट लाभ; सुबत्ता-भरभराट, ऑगस्टची सुरुवात ऑसम!
12
आजचे राशीभविष्य २७ जुलै २०२५ : नवीन कार्यारंभ करण्यास अनुकूल, कसा जाईल आजचा रविवार...
13
राजकीय हस्तक्षेपामुळे राज्याचे उद्योगविश्व त्रस्त; विकासकामांना करतात विरोध, दादागिरीही वाढली
14
मंत्रिमंडळात फेरबदल होण्याची शक्यता नाही! निर्णय फक्त कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंबाबतच
15
ऑपरेशन सिंदूरवर संसदेच्या दोन्ही सभागृहांत विशेष चर्चा; शिष्टमंडळातील खासदारही सहभागी होणार
16
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी मालदीवच्या नेत्यांची लगबग, भेटी अन् चर्चा
17
सूतगिरण्यांच्या अर्थसाहाय्याबाबत आता समान निकष; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे निर्देश
18
अनिल अंबानी यांच्यावर सलग तिसऱ्या दिवशी ईडीचे छापे; विविध कार्यालयांतून कागदपत्रे जप्त
19
विजयदिनी शहीद जवानांच्या शौर्याला सलामी; कारगिलमध्ये २६ जुलै १९९९ रोजी फडकावला तिरंगा
20
‘निसार’ मोहीम पृथ्वी निरीक्षण क्षेत्रात आणणार क्रांती: इस्रो; उपग्रहाची वैशिष्ट्ये काय?

पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 19:13 IST

ज्याप्रकारे तुर्कीने पाकिस्तानची मदत भारताविरोधात जाण्याची हिंमत केली त्याची किंमत त्याला चुकवावी लागेल असंही बख्शी यांनी इशारा दिला.

नवी दिल्ली - भारताविरोधात लढाईत पाकिस्तानला मदत करून शस्त्र पुरवणाऱ्या तुर्कीला मोठी किंमत मोजावी लागणार आहे. ज्याप्रकारे तुर्कीने पाकिस्तानला शस्त्रे पुरवली तसेच त्याच्याविरोधातील युद्धात भारत तुर्कीचा विरोधक ग्रीसची सैन्य ताकद वाढवणार आहे असं भारतीय सैन्याचे माजी मेजर जनरल जीडी बख्शी यांनी म्हटलं. त्यांनी ग्रीससमोर ब्रह्मोस सुपरसोनिक क्रूज मिसाइल खरेदी करण्याचा प्रस्ताव ठेवला. तुर्कीचा कट्टर शत्रू ग्रीससोबत मैत्री आणि पूर्व मध्य सागरात भारताची हजेरी रेसेप तैय्यप एर्दोगनविरोधात नवं आव्हान निर्माण होऊ शकते असं त्यांनी सांगितले.

ग्रीक वेबसाइट Directus शी बोलताना जनरल जीडी बख्शी म्हणाले की, ब्रह्मोस सुपरसोनिक मिसाईल, आकाश एअर डिफेन्स सिस्टम आणि पिनाका मिसाईल लॉन्चर ग्रीस भारताकडून खरेदी करू शकतो. त्याची युद्धात चाचणीही झाली आहे. संपूर्ण जगाने त्याची चांगली कामगिरी पाहिली आहे. ब्रह्मोस मिसाईलला अडवता येऊ शकत नाही असं त्यांनी म्हटलं.

त्याशिवाय भारताने ८ टँक बनवले आहेत. ज्याला तोपखाना प्रणालीत विकसित केले आहेत. भारताचे हे शस्त्र तुर्कीला घाम फोडू शकते. जर तुर्कीचा ग्रीस अथवा सायप्रससोबत काही वाद झाला तर भारतीय शस्त्रांच्या मदतीने हे देश तुर्कीला धूळ चारू शकतात असंही जीडी बख्शी यांनी दावा केला आहे. भारताने ग्रीस आणि सायप्रसला मदत करून तुर्कीला डोळे वटारून दाखवले पाहिजे. ज्याप्रकारे तुर्कीने पाकिस्तानची मदत भारताविरोधात जाण्याची हिंमत केली त्याची किंमत त्याला चुकवावी लागेल असंही बख्शी यांनी इशारा दिला.

दरम्यान, तुर्कीने पाकिस्तानला ड्रोन्स आणि शस्त्रे पुरवली होती. ज्यात एअरबेसचे २ मोबाईल कमांड आणि कंट्रोल सेंटरचाही समावेश होता. त्याला भारताने उद्ध्वस्त केले. भारताने पाकिस्तानातील नूरखान एअरबेस उद्ध्वस्त केले. आता तुर्कीने पाकिस्तानला जमिनीवरून मारा करणारी मिसाईल विकण्याची तयारी केली आहे कारण चीनच्या मिसाईलने पाकिस्तानची फजिती झाली. चिनी शस्त्रांनी भारतीय ताकदीसमोर नांगी टाकली असंही माजी जनरल बख्शी यांनी म्हटलं.

"मुस्लीम देशांचे नेतृत्व करायचंय..."

तुर्कीचे राष्ट्रपती रेसेप तैय्यप एर्दोगन जगात मुस्लिम देशांचे नेतृत्व करू इच्छितो. एर्दोगनला ऑटोमन साम्राज्य पुन्हा प्रस्थापित करायचंय. तुर्कीची अर्थव्यवस्था संकटात आहे. देशातंर्गत राजकीय समस्येला तुर्की तोंड देत आहे. एर्दोगनला यांना सौदी अरबला हटवून तुर्कीला जगातील मुस्लीम वर्ल्ड केंद्र बनवायचे आहे असं बख्शी यांनी सांगितले.  

टॅग्स :IndiaभारतPakistanपाकिस्तान