अलिंगन देऊन आईने केले मुलीच्या मारेक-याला माफ
By Admin | Updated: June 14, 2014 10:42 IST2014-06-13T11:43:01+5:302014-06-14T10:42:09+5:30
स्वत:च्या पोटच्या पोरीची हत्या करणा-याला एका आईने अलिंगन देऊन माफ केल्याची अचंबित करणारी घटना घडली आहे.

अलिंगन देऊन आईने केले मुलीच्या मारेक-याला माफ
>ऑनलाइन टीम
मियामी (फ्लोरिडा), दि. १३ - स्वत:च्या पोटच्या पोरीची ज्याच्या हातून हत्या झाली त्याच मारेक-याला एका आईने न्यायालयात गाढ अलिंगन देऊन माफ केल्याची अचंबित करणारी घटना घडली आहे. त्या महिलेची ही कृती पाहून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
२०१२ साली जॉर्डन होव याच्या हातून त्याच्या शाळेतील मैत्रिणीची अनावधानाने हत्या झाली. जॉर्डन त्याच्या सावत्र वडिलांची बंदूक स्कूलबसमध्ये घेऊन आला होता. आपल्या मित्रांना ती दाखवत असताना अनावधानाने बंदुकीतील गोळी सुटली आणि ती त्याच्या मैत्रिणीला लागल्याने तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी न्यायालयात सुरू असलेल्या खटल्यादरम्यान त्या मृत मुलीच्या आईने जॉर्डनला माफ केले. तिच्या या कृतीमुळे न्यायाधीशांसह कोर्टात उपस्थित असलेले सर्व जण अचंबित झाले.
दरम्यान, त्या महिलेच्या माफीमुळे जॉर्डनची अवघ्या एक वर्षात तुरुंगातून सुटका होईल, अन्यथा त्याला हत्येच्या गुन्ह्याखाली कित्येक वर्ष तुरूंगवास भोगावा लागला असता.