शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

इराणच्या घातक हल्ल्यांनी भडकले इस्लामिक देश; सौदी, पाकिस्तानसह १२ देशांनी दिली थेट वॉर्निंग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2026 18:56 IST

इराणने अरब देशांमधील तेल प्रकल्प, कारखाने, विमानतळे, निवासी इमारती आणि राजनैतिक संकुलांवरही हल्ले केले आहेत.

रियाध - इराणच्या घातक मिसाइल हल्ल्यांनी खवळलेल्या आखाती देशांनी तेहरानला हल्ले रोखण्याची वॉर्निंग दिली आहे. अरब आणि इस्लामिक देशांच्या परराष्ट्र मंत्र्‍यांची रियाधमध्ये इराणी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर बैठकीचं आयोजन केले होते. बुधवारी झालेल्या या बैठकीत अझरबैजान, बहरीन, इजिप्त, जॉर्डन, कुवेत, लेबनान, पाकिस्तान, कतार, सौदी अरेबिया, सीरिया, तुर्की आणि UAE च्या परराष्ट्र मंत्र्‍यांनी सहभाग घेतला होता. 

या बैठकीनंतर १२ इस्लामिक देशांनी इराणला तातडीने हल्ले बंद करण्याची वॉर्निंग देण्यात आली आहे. या देशांच्या संयुक्त निवेदनात म्हटलं की, इराणला सुरक्षा परिषदेचा प्रस्ताव २८१७ चे पालन करायला हवे. सर्व हल्ले तातडीने बंद करायला हवेत. शेजारील देशांविरोधात कुठलीही भडकवणारी कारवाई अथवा धमकी कोणत्याही अटीशिवाय बंद करावी. अरब देशांनी त्यांच्या सशस्त्र गटांना पाठिंबा देणे, निधी पुरवणे आणि शस्त्रे पुरवणे थांबवावे असंही आवाहन करण्यात आले आहे. इराणनं स्वतःची उद्दिष्ट्ये साध्य करण्यासाठी आणि या देशांच्या हिताच्या विरोधात हे करत आहे असंही या देशांनी म्हटलं.

इराण अरब देशांचे ऐकणार?

इराणनं होर्मुझच्या सामुद्रधुनीतील आंतरराष्ट्रीय जलवाहतुकीत अडथळा आणण्याच्या किंवा ती रोखण्याच्या उद्देशाने केलेल्या कोणत्याही उपाययोजना किंवा धमक्यांपासून दूर राहावे असं अरब देशांनी जारी केलेल्या एका निवेदनात इराणला आवाहन करण्यात आले आहे. तसेच बाब अल-मंदाबमधील सागरी सुरक्षेला धोका निर्माण करू नये असंही सांगण्यात आले आहे. इस्लामिक देशांच्या मंत्र्यांनी गल्फ कोऑपरेशन कौन्सिल (GCC) देश, जॉर्डन, अझरबैजान आणि तुर्कीवर इराणने केलेल्या हल्ल्यांवर चर्चा केली. इराणने अरब देशांमधील तेल प्रकल्प, कारखाने, विमानतळे, निवासी इमारती आणि राजनैतिक संकुलांवरही हल्ले केले आहेत.

दरम्यान, या निवेदनाच्या शेवटी सर्व इस्लामिक देशांच्या मंत्र्‍यांनी पुढील काळात सल्लामसलत आणि समन्वय सुरू ठेवण्याचा उल्लेख केला आहे. जेणेकरून यापुढच्या घडामोडींवर लक्ष ठेवणे आणि नव्याने उदभवणाऱ्या समस्यांचे मूल्यांकन करून एक समान भूमिका तयार करणे. आपली सुरक्षा, स्थिरता आणि सार्वभौमत्व जपण्यासाठी व आपल्या प्रदेशांवरील "इराणचे घृणास्पद हल्ले" रोखण्यासाठी आवश्यक कायदेशीर उपाय आणि कार्यपद्धतींचा अवलंब करणे या हेतूने इस्लामिक देश इराणविरोधात एकवटले आहेत. 

English
हिंदी सारांश
Web Title : Islamic Nations Warn Iran Over Missile Attacks; Demand Halt

Web Summary : Following missile attacks, twelve Islamic nations, including Saudi Arabia and Pakistan, have warned Iran to cease hostilities. They demand Iran adhere to UN resolutions and stop supporting armed groups, aiming to safeguard regional security and sovereignty.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणPakistanपाकिस्तान