शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

"तुम्ही चुकीच्या व्यक्तीला प्रश्न विचारताय...", निज्जर हत्येच्या प्रश्नावर एस जयशंकर यांची प्रतिक्रिया

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2023 11:32 IST

भारत आणि कॅनडासह जगातील अनेक देशांमध्ये सध्या खलिस्तानची चर्चा जोरात सुरू आहे. 

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो (Justin Trudeau) यांनी भारतावर खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जर याची हत्या केल्याचा आरोप केला आहे. यावरुन दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला असून याचे पडसाद संपूर्ण जगभरात उमटल्याचे पाहायला मिळत आहेत. भारत आणि कॅनडासह जगातील अनेक देशांमध्ये सध्या खलिस्तानची चर्चा जोरात सुरू आहे. 

दरम्यान, अमेरिकेतील न्यूयॉर्क येथे आयोजित 'कौन्सिल ऑन फॉरेन रिलेशन्स' कार्यक्रमात भारताचे परराष्ट्रमंत्री एस जयशंकर सहभागी झाले होते. यावेळी एका पत्रकाराने एस जयशंकर यांना खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरच्या हत्येबाबतचा गुप्तचर अहवाल द फाइव्ह आयजमध्ये शेअर करण्यात आला होता, त्याबद्दल विचारले. यावर एस जयशंकर यांनी फाइव्ह आयजचा भाग नसल्याचे सांगत तुम्ही चुकीच्या व्यक्तीला विचारत आहात, अशी प्रतिक्रिया दिली. 

एस जयशंकर म्हणाले, "मी द फाइव्ह आयजचा भाग नाही, मी एफबीआयचा भाग नक्कीच नाही. त्यामुळे मला वाटते की, तुम्ही चुकीच्या व्यक्तीला प्रश्न विचारत आहात." दरम्यान, 'फाइव्ह आयज' नेटवर्क ही एक गुप्तचर संघटना आहे, ज्यामध्ये युनायटेड स्टेट्स, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रेलिया, कॅनडा आणि न्यूझीलंड यांचा समावेश आहे. ही संघटना पाळत ठेवणे-आधारित आणि सिग्नल इंटेलिजन्स (SIGINT) दोन्ही आहे.

कॅनडातील ब्रिटिश कोलंबिया प्रांतातील सरे येथील गुरुद्वाराबाहेर 18 जून रोजी दोन अज्ञात बंदूकधाऱ्यांनी खलिस्तानी दहशतवादी हरदीपसिंग निज्जरची गोळ्या झाडून हत्या केली होती. यानंतर  कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी भारतावर हरदीपसिंह निज्जर याची हत्या केल्याचा आरोप केला होता. यावरुन दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झाला असून याचे पडसाद संपूर्ण जगभरात उमटल्याचे पाहायला मिळत आहेत.  

टॅग्स :S. Jaishankarएस. जयशंकरAmericaअमेरिकाIndiaभारतCanadaकॅनडा