शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

इंडोनेशियात स्टॉक एक्सचेंज इमारतीचा पहिला मजला कोसळल्यानं 75 लोक जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 15:16 IST

इंडोनेशियातील स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीचा एक मजला कोसळल्यामुळे जवळपास 75 लोक जखमी झाले आहेत, अशी माहिती इंडोनेशियन पोलिसांनी दिली आहे.

जकार्ता- इंडोनेशियातील स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीचा एक मजला कोसळल्यामुळे जवळपास 75 लोक जखमी झाले आहेत, अशी माहिती इंडोनेशियन पोलिसांनी दिली आहे. ज्या वेळी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरचा काही भाग निखळला, त्यावेळी काचा, धातू आणि इतर सामग्री तळमजल्यावर कोसळल्या. त्यामुळे या अपघातात जवळपास 75 लोक जखमी झाले. जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.जकार्ता पोलिसांच्या प्रवक्त्यानं सांगितलं की, ही घटना कोणत्याही स्फोटानं झालेली नाही. सुदैवानं अद्याप कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. दुर्घटनेनंतर विविध वृत्तवाहिन्यांवर दाखवण्यात आलेल्या छायाचित्रांमुळे इंडोनेशियात या घटनेनं एकच खळबळ उडाली होती. एका प्रत्यक्षदर्शीनंही या घटनेचा वृत्तांत सांगितला आहे. मी अनेकांना रक्ताच्या थारोळ्यात पडलेलं पाहिलंय. अनेक लोकांना इमारतीच्या बाहेर आणलं गेलं.रुग्णवाहिका येईपर्यंत त्यांना इमारतीच्या बाहेरील गवतावर झोपवण्यात आलं होतं. लॉबी इमारतीच्या ढिगा-यानं भरलेली होती. इमारतीत काम करणा-या अनेक कर्मचा-यांना सुखरूपरीत्या बचाव पथकानं बाहेर काढलं. बचाव पथक, पोलीस आणि अग्निशमन दलाचे जवान अद्यापही ढिगारा हटवण्याचं काम करत आहेत. बचावकार्य पथकानं ढिगारा उपसला असून, आणखी कोणी जखमी नाहीत ना, याचा तपास करत आहेत. 

टॅग्स :Indonesiaइंडोनेशिया