शहरं
Join us  
Trending Stories
1
झोपेत बायकोने नवऱ्याच्या अंगावर टाकलं उकळतं पाणी; जीव वाचवण्यासाठी पळताच अ‍ॅसिड टाकून जाळले
2
स्टीलच्या ग्लासात सुतळी बॉम्ब ठेवून फोडला; २० वर्षीय युवक जीवाला मुकला, कुठे घडला भयानक प्रकार?
3
WI vs BAN Super Over : ९ चेंडूंची सुपर ओव्हर! ३ फुकटच्या धावा; तरी वेस्ट इंडिजसमोर बांगलादेशची फजिती
4
भाजपा मंत्र्यांच्या समर्थकांची गुंडगिरी; युवकाला नाक घासून माफी मागायला लावली, पोलिसही हतबल
5
Womens World Cup : लाजिरवाण्या पराभवासह पाक संघ OUT; सेमीसह फायनल भारतात खेळवण्याचा मार्ग मोकळा!
6
सुवर्णाची झळाळी, शिर्डीत लक्ष्मीपूजनाचा सोहळा; साईमंदिरात दिवाळी, साई मूर्तीवर अडीच कोटींचे अलंकार
7
पाकिस्तानात मोठा हल्ला, २५ सैनिक मारले गेले; TTP चा खैबर पख्तूनख्वा इथल्या लष्करी तळावर कब्जा
8
एका रात्रीत मोठा गेम! महायुतीचेच ३ माजी आमदार भाजपा फोडणार?; स्थानिक कार्यकर्तेच संतापले
9
क्रिकेटमधील पराभव जिव्हारी लागला, १०० च्या स्पीडने कार पळवली; दिवाळीची खरेदी करणाऱ्यांना चिरडले
10
ट्रेनमधील पांढऱ्या बेडशीट्स विसरा; भारतीय रेल्वे आता देणार खास प्रिंटेड कव्हर ब्लँकेट्स !
11
Mumbai: व्हॅनमधून रडण्याचा आवाज आला, पोलिसांनी पुढं जाऊन पाहिलं तर...; घटनेनं परिसरात खळबळ!
12
दिवाळीत ₹6 लाख कोटींची विक्रमी उलाढाल; भारतीयांची 'Made In India' वस्तूंना पसंती
13
कोण आहे फ्रांसेस्का ऑर्सिनी? ज्यांच्याकडे ५ वर्षाचा ई-व्हिसा असूनही भारतात प्रवेश नाकारला
14
Crime: आधी हात-पाय बांधले, नंतर उशीनं तोंड दाबलं...; व्यसनमुक्ती केंद्रातील घटनेनं खळबळ!
15
ODI Record: वनडेमध्ये आतापर्यंत कधीच 'असं' घडलं नव्हतं, ते वेस्ट इंडीजनं केलं!
16
सोलापूरात भाजपात दुफळी! "बाहेरून येणाऱ्यांनी किमान ३-४ वर्ष पक्षाचं काम करावं, त्यानंतरच.."
17
मोठी बातमी! १२ हजार भावांनी घेतला लाडकी बहीण योजनेचा लाभ; १६४ कोटींचा घोटाळा आला समोर
18
Mumbai Fire: माजी उपमहापौर अरुण देव यांच्या अंधेरी येथील घराला आग
19
२० एकर जमिनीसाठी लेकीने आईचा घेतला बळी, पतीच्या मदतीने मृतदेह रिक्षात भरला अन् तितक्यात...
20
BCCI: "आशिया चषक भारताला न दिल्यास..." बीसीसीआयचा मोहसिन नक्वी यांना इशारा!

स्पेनमध्ये  'महापूर', 205 जणांचा मृत्यू, 1900 बेपत्ता, 130000 हून अधिक घरांची वीज गुल; पंतप्रधानांनी पाठवले 2000 सैनिक

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2024 13:58 IST

पुरामुळे बुधवारी सकाळच्या सुमारास 12 मृतांची नोंद झाली. आता मृतांचा आकडा 205 वर पोहोचला आहे. व्हॅलेन्सियामध्ये 202, कॅस्टिला-ला मांचामध्ये 2 आणि अंडालुसियामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे.

स्पेनला महापुराच्या जबरदस्त फटका बसला आहे. या नैसर्गिक आपत्तीत आतापर्यंत 200 हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या पुराचा सर्वाधिक फटका व्हॅलेन्सिया या शहराला बसला आहे. सीएनएच्या वृत्तानुसार, या आपत्तीत किमान 205 जणांचा मृत्यू झाला आहे. सर्वाधिक लोक व्हॅलेन्सिया शहरातील आहेत. यासंदर्भात अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही भागांत रस्ते खचले आहेत. यामुळे आपत्कालीन सेवा पोहोचवणे अशक्य झाले आहे.

पुरामुळे 205 जणांचा मृत्यू - पुरामुळे बुधवारी सकाळच्या सुमारास 12 मृतांची नोंद झाली. आता मृतांचा आकडा 205 वर पोहोचला आहे. व्हॅलेन्सियामध्ये 202, कॅस्टिला-ला मांचामध्ये 2 आणि अंडालुसियामध्ये एकाचा मृत्यू झाला आहे. व्हॅलेन्सियातील फेरिया एक्झिबिशन सेंटरचे रूपांतर तात्पुरत्या शवागारात करावे लागले आहे. अद्यापही अनेक जण बेपत्ता आहेत, यामुळे मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.

स्पॅनिश वृत्तपत्रांनुसार, 1900 लोक द्यापही बेपत्ता आहेत. प्रभावित भागातील प्रत्यक्षदर्शींनी म्हटले आहे की, अनेक लोक आपल्या गाड्या वाचवण्यासाठी भूमिगत गॅरेजमध्ये गेले आणि पाण्यात अडकले. अशा अनेक वेदनादायक घटना प्रसारमाध्यमांमध्ये येत आहेत. पुरामुळे 1,30,000 हून अधिक घरांची वीज गेली होती. आज शुक्रवारपर्यंत, 23000 घरांची वीज अद्यापही गूल होती.

कशामुळे आला पूरदेशाच्या पूर्वेकडील आणि दक्षिण-पूर्व भागात, जसे की व्हॅलेन्सिया, कॅस्टिला-ला मंचा आणि अँडालुसिया येथे मोठ्या प्रमाणावर विनाश झाला आहे. सिन्हुआ न्यूज एजन्सीनुसार, या भागातील जमीन अतिवृष्टीचे पाणी शोषू शकली नाही. यामुळे मंगळवारी रात्री, मुसळधार पाऊस झाला आणि अचानक पूर आला. तसेच, जागतिक हवामान संघटनेच्या (WMO) मते, हवामान बदलामुळे अतिपरिणामकारक पूर आणि दुष्काळाचे कारण बनणाऱ्या हवामानातील घटना अधिक संभाव्य आणि अधिक गंभीर झाल्या आहेत. आणि हे वारंवार घडणाऱ्या घटनांवरून सिद्ध होत आहे. 

या पूरात, पुल, रेल्वेचे बोगदे, कार, वाहून गेले आहेत शेती पाण्याखाली गेली आहे. 100 वर रस्त्यांचे नुकसान झाले आहे. खेत पानी में डूब गए. स्वतःचा जीव वाचवण्यासाठी लोक घरांवर आणि कारच्या छतांवर चढून बसले. मात्र सर्वच लोक वाचू शकले नाही.2,000 सैनिक, 400 वाहने 15 हेलिकॉप्टर्स मदतीसाठी - स्पेनेच पंतप्रधान पेद्रो सांचेज यांनी गुरुवारी प्रभावित भागाचा दौरा केला आणि सर्व प्रकारचे सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. याशिवाय सरकारने तीन दिवसांचा शोकही घोषित केला हाहे. जवळपास 2,000 सैनिक, 400 वाहने आणि 15 हेलिकॉप्टर्स मदत आणि बचाव कार्यासाठी उतरवण्यात आले आहे. 

टॅग्स :floodपूरDeathमृत्यूRainपाऊस