उड्डाणाचा खोळंबा.. माजी गृहमंत्र्याला विमान प्रवाशांनी हाकलले

By Admin | Updated: September 17, 2014 08:49 IST2014-09-17T03:01:52+5:302014-09-17T08:49:18+5:30

माजी मंत्री, खासदार वेळेवर न आल्यामुळे विमान उड्डाणाला उशीर झाल्यास या दोन महत्त्वाच्या प्रवाशांना अन्य प्रवासी विमानात पायही ठेवू देत नाहीत,

Flight detention .. Air travel by the passengers of the former Home Ministry | उड्डाणाचा खोळंबा.. माजी गृहमंत्र्याला विमान प्रवाशांनी हाकलले

उड्डाणाचा खोळंबा.. माजी गृहमंत्र्याला विमान प्रवाशांनी हाकलले

पाकमध्ये रहमान मलिक यांची फजिती : तळावर यायला अडीच तास उशीर, घटनेचे चित्रीकरण स्थानिक वाहिन्यांनी दाखविले
कराची : माजी मंत्री, खासदार वेळेवर न आल्यामुळे विमान उड्डाणाला उशीर झाल्यास या दोन महत्त्वाच्या प्रवाशांना अन्य प्रवासी विमानात पायही ठेवू देत नाहीत, असे घडण्याची शक्यता कमी; परंतु पाकिस्तानात संतप्त प्रवाशांनी हे करून दाखविले आहे.
पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे पीके-37क् हे कराची ते इस्लामाबाद विमान सोमवारी तब्बल अडीच तास उशिराने उडाले. हा उशीर झाला तो पाकिस्तानचे माजी गृहमंत्री व पाकिस्तान पीपल्स पार्टीचे संसद सदस्य रहमान मलिक आणि नॅशनल असेम्ब्लीचे सदस्य डॉ. रमेशकुमार वाकवाणी यांच्यामुळे. हे दोघे आलेले नसल्यामुळे त्यांच्यासाठी विमान थांबविण्यात आले होते. हे दोघे एकदाचे आले तेव्हा प्रवाशांनी त्यांना विमानात चढू दिले नाही.
मलिक यांच्याशी प्रवाशांचा वाद झाल्यानंतर व प्रवासी त्यांच्यावर ओरडल्यामुळे घाईघाईने माघारी निघालेले मलिक या घटनेचे चित्रीकरण झाले व ते स्थानिक दूरचित्रवाणी वाहिनीवर पुन्हा पुन्हा प्रक्षेपित होत होते. प्रवाशांच्या संतापात विमानातील कर्मचारीही सहभागी होते.
दरम्यान, पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सचे प्रवक्ते मशूद तजवार यांनी विमानाला झालेला उशीर हा तांत्रिक कारणांमुळे होता. मलिक किंवा वाकवाणी यांच्यामुळे नव्हता, असा दावा ‘डॉन’ या दैनिकाकडे केला. पीआयए अतिमहत्त्वाच्या व्यक्तींना महत्त्व द्यायची संस्कृती जोपासत नाही; परंतु विमानाला झालेला दीड तासाचा उशीर तांत्रिक होता. नेमका उशीर कशामुळे झाला हे आम्ही शोधत आहोत, असेही तजवार म्हणाले. (वृत्तसंस्था)
 
4संतप्त प्रवासी म्हणत होते.‘‘ मलिक साहेब, सॉरी. तुम्ही माघारी जा. या प्रवाशांची तुम्ही क्षमा मागा. तुमच्यामुळे या 250 प्रवाशांना त्रस झाला, तुम्हाला त्याची लाज वाटली पाहिजे. सर, चूक तुमची आहे. तुम्ही मंत्रीही नाही आणि असते तरी आम्ही त्याची पत्रस बाळगली नसती.’’

 

Web Title: Flight detention .. Air travel by the passengers of the former Home Ministry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.