अमेरिकेत फ्लोरिडातील नाईट क्लबमध्ये गोळीबार, २ ठार, १७ जखमी
By Admin | Updated: July 25, 2016 16:13 IST2016-07-25T14:02:55+5:302016-07-25T16:13:22+5:30
मेरिकेत सातत्याने गोळीबाराच्या घटना घडत आहेत. सोमवारी रात्री फ्लोरिडातील नाईट क्लबमध्ये झालेल्या गोळीबारात एक जण ठार झाला.

अमेरिकेत फ्लोरिडातील नाईट क्लबमध्ये गोळीबार, २ ठार, १७ जखमी
ऑनलाइन लोकमत
फ्लोरिडा, दि. २५ - अमेरिकेत सातत्याने गोळीबाराच्या घटना घडत आहेत. सोमवारी रात्री फ्लोरिडातील क्लब ब्लू नाईट क्लबमध्ये झालेल्या गोळीबारात दोन जण ठार झाले असून, अनेक जण जखमी झाले आहेत.
१७ जण या गोळीबारात जखमी झाल्याची माहिती आहे. पश्चिम फ्लोरिडातील फोर्ट मायर्स येथील नाईट क्लबमध्ये ही घटना घडली. काही आठवडयांपूर्वी अमेरिकेतील ओरलँडो येथील नाईट क्लबमध्ये बंदुकधा-याने केलेल्या गोळीबारात ४९ जण ठार झाले होते. ब्लू नाईट क्लबच्या पार्किंगमध्ये हा गोळीबार झाला. पोलिसांनी चौकशीसाठी तिघांना ताब्यात घेतले आहे.
क्लब ब्लूमध्ये कार्यक्रम सुरु असताना ही घटना घडली. घटनास्थळी पोलिसांच्या गाडया दाखल झाल्या असून, परिसराला छावणीचे स्वरुप आले आहे.