पाकमध्ये पाच दहशतवाद्यांना फाशी
By Admin | Updated: December 25, 2014 01:40 IST2014-12-25T01:40:52+5:302014-12-25T01:40:52+5:30
पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या फाशीसाठी नागरिक आग्रही आहेत, तर दहशतवादी संतप्त असून, सरकार फाशीची अमलबजावणी पुढे रेटताना दिसत आहेत

पाकमध्ये पाच दहशतवाद्यांना फाशी
लाहोर : पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या फाशीसाठी नागरिक आग्रही आहेत, तर दहशतवादी संतप्त असून, सरकार फाशीची अमलबजावणी पुढे रेटताना दिसत आहेत. पेशावरमधील शाळेतील हल्ल्यात शाळकरी मुलासह १४१ जण ठार झाल्यानंतर सरकारने फाशीच्या शिक्षेवरील बंदी उठवली असून, दररोज टप्प्याटप्प्याने दहशतवाद्यांना फाशी दिली जात आहे. पाक दहशतवाद्यांचे डेथवारंट निघाले आहे.
लाहोर उच्च न्यायालयाच्या रावळपिंडी खंडपीठाचे न्या. अर्शद मेहमूद तबस्सुम सरकारची याचिका दाखल करून या दहशतवाद्यांच्या फाशीवरील बंदी उठवली आहे. झेलम जिल्ह्यात चिनाब नदीवरील लष्करी ठाणे व मुल्तान येथील आयएसआयच्या कार्यालयावर हल्ला केल्याचा आरोप या दहशतवाद्यांवर होता. उमर नदीम, असिफ इद्रीस, अहसान अझीम, अमीर युसूफ व कामरान अशी या कैद्यांची नावे आहेत. लाहोरमधील कोट लखपत तुरुंगात ते शिक्षा भोगत होते. या पाच जणांचे मृत्यूचे आदेश निघाले असून, त्यांना बुधवारी वा गुरुवारी कधीही फाशी दिली जाऊ शकते, असे तुरुंगाचे अधीक्षक असाद वारिया यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)