जर्मनीत माथेफिरुच्या हल्ल्यात पाच जण जखमी

By Admin | Updated: March 10, 2017 05:25 IST2017-03-10T03:21:57+5:302017-03-10T05:25:49+5:30

येथील ड्यूसेल्डॉर्फ रेल्वे स्टेशनवर एका माथेफिरु व्यक्तीने थैमान घालत अनेकांवर कु-हाडीने वार केल्याचे वृत्त आहे.

Five people were injured in the attack in Germany | जर्मनीत माथेफिरुच्या हल्ल्यात पाच जण जखमी

जर्मनीत माथेफिरुच्या हल्ल्यात पाच जण जखमी

>ऑनलाइन लोकमत
जर्मनी, दि. 10 - येथील ड्यूसेल्डॉर्फ रेल्वे स्टेशनवर एका माथेफिरु व्यक्तीने थैमान घालत अनेकांवर कु-हाडीने वार केल्याचे वृत्त आहे. 
मिळालेल्या माहितीनुसार, ड्यूसेल्डॉर्फ रेल्वे स्टेशनवर एका माथेफिरु व्यक्तीने थैमान घातल्याची घटना गुरुवारी घडली. या घटनेत स्टेशनवर उपस्थित असलेल्या काही लोकांवर त्याने कु-हाडीने वार केले. यामध्ये पाच जण जखमी झाले आहेत. दरम्यान, घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून माथेफिरुला अटक केली आहे. तसेच, जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 
याचबरोबर या घटनेमागे दहशतवादी संघटनेचा हात असल्याचा संशय व्यक्त केला जात असून देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.  

Web Title: Five people were injured in the attack in Germany