चकमकीत पाच अतिरेकी ठार
By Admin | Updated: March 13, 2016 22:52 IST2016-03-13T22:52:41+5:302016-03-13T22:52:41+5:30
पाकिस्तानात पंजाब प्रांताच्या सरकारी कार्यालयांना लक्ष्य करण्याच्या तयारीत असलेल्या पाच अतिरेक्यांना ठार मारण्यात आले. सुरक्षा दल आणि अतिरेकी यांच्यात ही चकमक झाली.

चकमकीत पाच अतिरेकी ठार
लाहोर : पाकिस्तानात पंजाब प्रांताच्या सरकारी कार्यालयांना लक्ष्य करण्याच्या तयारीत असलेल्या पाच अतिरेक्यांना ठार मारण्यात आले. सुरक्षा दल आणि अतिरेकी यांच्यात ही चकमक झाली. या अतिरेक्यांकडून मोठ्या प्रमाणात शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली आहेत.
लाहोरपासून ७० कि.मी. दूर असलेल्या ननकाना साहिबच्या शाहकोट भागात ही चकमक झाली. हे अतिरेकी एका घरात लपले असल्याची माहिती मिळाल्यानंतर अतिरेकी विरोधी पथकाने या घराला घेरले आणि या अतिरेक्यांना शरण येण्याचे आवाहन केले; पण या अतिरेक्यांनी गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात केलेल्या गोळीबारात हे पाचही अतिरेकी मारले गेले.