मेलबर्नमध्ये विमान दुर्घटनेत पाच ठार

By Admin | Updated: February 21, 2017 11:53 IST2017-02-21T11:49:57+5:302017-02-21T11:53:04+5:30

ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये एका शॉपिंग सेंटरवर विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली.

Five killed in plane crash in Melbourne | मेलबर्नमध्ये विमान दुर्घटनेत पाच ठार

मेलबर्नमध्ये विमान दुर्घटनेत पाच ठार

ऑनलाइन लोकमत
मेलबर्न, दि. 21 -  ऑस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये एका शॉपिंग सेंटरवर विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मेलबर्नमधील इस्डन फील्ड्स विमानतळावरुन या विमानाने उड्डाण केल्यानंतर अवघ्या काही क्षणात येथील एका शॉपिंग सेंटरवर कोसळले. त्यानंतर या विमानाला मोठ्याप्रमाणात आग लागली. या दुर्घटनेत विमानातील पाच प्रवाशांचा मृत्यू झाला.
दरम्यान, शॉपिंग सेंटर सुरु होण्यापुर्वी काही तास अगोदर ही दुर्घटना घडली. त्यामुळे मोठी मोठी जिवीतहानी टळली,असल्याचे पोलिसांनी सांगितले. 
तसेच, गेल्या तीन दशकातील सर्वांत मोठी ही दुर्घटना असल्याचे विक्टोरियाचे प्रीमिअर डॅनियल अँड्र्यूज यांनी सांगितले.

 

Web Title: Five killed in plane crash in Melbourne