शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

सुपर कॉम्प्युटिंग क्षेत्रातील पाच चिनी संस्था अमेरिकेच्या काळ्या यादीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2019 05:54 IST

सुपर कॉम्प्युटिंग क्षेत्रातील पाच चिनी संस्थांना अमेरिकेने काळ्या यादीत टाकले आहे.

वॉशिंग्टन : सुपर कॉम्प्युटिंग क्षेत्रातील पाच चिनी संस्थांना अमेरिकेने काळ्या यादीत टाकले आहे. लष्कराशी संबंधित उपकरणांवर काम करणाऱ्या या संस्थांना राष्ट्रीय सुरक्षेच्या कारणावरून काळ्या यादीत टाकण्यात येत असल्याचे अमेरिकेने म्हटले आहे.अमेरिका सरकारच्या वाणिज्य विभागाने ही कारवाई केली आहे. अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्यात पुढील आठवड्यात चर्चा होत असतानाच ही कारवाई करण्यात आली आहे. या चर्चेवर त्यामुळे परिणाम होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.काळ्या यादीत टाकण्यात आलेल्या संस्थांत सुपर कॉम्प्युटर निर्माती संस्था सुगॉनचा समावेश आहे. सुगॉन ही कंपनी मोठ्या प्रमाणात अमेरिकी पुरवठ्यावर अवलंबून आहे. सुगॉनच्या पुरवठादारांत इंटेल, एनव्हिडिया आणि अ‍ॅडव्हॉन्सड मायक्रो डिव्हायसेस यांचा समावेश आहे. याशिवाय वुशी जियांगनान इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी आणि सुगॉनच्या तीन उपकंपन्यांनाही काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.अमेरिकी वाणिज्य मंत्रालयाने म्हटले की, सुगॉन आणि वुशी जियांगनान इन्स्टिट्यूट या संस्था चीनच्या लष्करी संशोधन संस्थेच्या मालकीच्या आहेत. चिनी लष्करासाठी पुढील पिढीतील उच्चक्षमता असलेली संगणकीय प्रणाली विकसित करण्याचे काम या संस्था करीत आहेत.जागतिक जोखीम अभ्यासक युरोशिया समूहाचे तंत्रज्ञान विश्लेषक पॉल ट्रायोलो यांनी सांगितले की, आण्विक सिम्युलेशन्स, क्षेपणास्त्रांसाठी आवश्यक असलेली गणन यंत्रणा आणि हायपरसॉनिक अलगोरिदम विकसित करण्याच्या कामात या संस्था गुंतलेल्या आहेत. संगणकशास्त्रात प्रभुत्व मिळविण्याची ही स्पर्धा आहे. चीन याला आत्यंतिक महत्त्व देताना दिसत आहे. त्यासाठी सुगॉनसारख्या अनेक कंपन्यांना चीन सरकार पाठबळ देत आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीusamanpuraउस्मानपुरा