पहिल्या महिला व्हियाग्राला मंजुरी
By Admin | Updated: August 19, 2015 22:59 IST2015-08-19T22:59:51+5:302015-08-19T22:59:51+5:30
महिलांची कामेच्छा वाढविणाऱ्या जगातील पहिल्या औषधाला (महिला व्हियाग्रा) अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने मंगळवारी मंजुरी दिली

पहिल्या महिला व्हियाग्राला मंजुरी
वॉशिंग्टन : महिलांची कामेच्छा वाढविणाऱ्या जगातील पहिल्या औषधाला (महिला व्हियाग्रा) अमेरिकेच्या अन्न व औषध प्रशासनाने मंगळवारी मंजुरी दिली. अमेरिकेत १० पैकी एका महिलेला रजोनिवृत्तीपूर्वी कामेच्छा कमी होण्याची समस्या भेडसावते. अशा महिलांसाठी हे औषध वरदान ठरणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. मात्र, त्याचबरोबर या औषधाचे रक्तदाब कमी होणे किंवा शुद्ध हरपणे यासारखे दुष्परिणाम होऊ शकतात, असा इशाराही देण्यात आला आहे. (वृत्तसंस्था)