ट्रम्प यांच्या आश्वासनांमुळे पहिल्यांदाच डाऊ जोन्सचा सेन्सेक्स झेपावला

By Admin | Updated: January 25, 2017 21:46 IST2017-01-25T21:39:30+5:302017-01-25T21:46:04+5:30

अमेरिकी शेअर बाजारातील नावाजलेल्या डाऊ जोन्सचा निर्देशांक पहिल्यांदाच इतर कंपन्यांच्या तुलनेत 100 अंकांनी वधारला आहे.

For the first time Dow Jones's Sensex was shaken by Trump's promises | ट्रम्प यांच्या आश्वासनांमुळे पहिल्यांदाच डाऊ जोन्सचा सेन्सेक्स झेपावला

ट्रम्प यांच्या आश्वासनांमुळे पहिल्यांदाच डाऊ जोन्सचा सेन्सेक्स झेपावला

ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. 25 - अमेरिकी शेअर बाजारातील नावाजलेल्या डाऊ जोन्सचा निर्देशांक पहिल्यांदाच इतर कंपन्यांच्या तुलनेत 100 अंकांनी वधारला आहे. डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर डाऊ जोन्सचा निर्देशांकात एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढ नोंदवली गेली आहे. विशेष म्हणजे डाऊ जोन्सचा निर्देशांक वाढवण्यात डोनाल्ड ट्रम्प यांनी वॉल स्ट्रीटवर अतिउत्साहाच्या भरात दिलेली आश्वासनं कारणीभूत ठरली आहेत. शेअर मार्केट उघडताच डाऊ जोन्सच्या निर्देशांकांनी इतर कंपन्यांच्या तुलनेत 100 अंकांनी वधारून 20 हजारांपर्यंतची उसळी घेतली. त्यामुळे अमेरिकेतील शेअर बाजारात उत्साह संचारला. अचानक शेअर बाजारानं उसळी घेतल्यानं बाजार विश्लेषकांच्याही भुवया उंचावल्या आहेत.

दरम्यान, व्यापारीवर्ग आता पायाभूत सुविधांवर किती खर्च करण्यात येतो आहे, याची माहिती गोळा करत आहे. त्यांचा दृष्टिकोन एकदम स्पष्ट आहे, असं बाजारपेठ प्रमुख आणि बाजार विश्लेषक नईम अस्लाम म्हणाले आहेत. एस अँड पी 500  निर्देशांक 0.4 टक्क्यांनी वधारला आहे. 

डाऊ जोन्सचा निर्देशांक वधारल्यामुळे माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्राला याचा फायदा होणार असल्याचं अनेक जाणकारांचं म्हणणे आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर राबवलेल्या विकासाच्या धोरणांमुळे ही वाढ नोंदवली गेल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. तर ट्रम्प यांनी एक्झिक्युटिव्ह ऑर्डरवर स्वाक्षरी केली असून, तेही एक कारण शेअर बाजारात उत्साह संचारण्यासाठी कारणीभूत ठरल्याची चर्चा आहे. डाऊ जोन्सचा निर्देशांक एवढ्या मोठ्या प्रमाणात वाढल्यानंतर गुंतवणूकदारांनीही कंपन्यांच्या तिमाही निकालावर लक्ष्य केंद्रित केलं आहे. 

Web Title: For the first time Dow Jones's Sensex was shaken by Trump's promises

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.