इसिसचे बांगलादेशात पहिले दहशतवादी कृत्य
By Admin | Updated: September 29, 2015 23:12 IST2015-09-29T23:12:52+5:302015-09-29T23:12:52+5:30
येथील कडेकोट सुरक्षा व्यवस्थेतील राजनैतिक परिसरामध्ये एका इटालियन मदत कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. खतरनाक दहशतवादी संघटना इसिसने जबाबदारी घेतलेला हा बांगलादेशातील पहिलाच हल्ला आहे.

इसिसचे बांगलादेशात पहिले दहशतवादी कृत्य
ढाका : येथील कडेकोट सुरक्षा व्यवस्थेतील राजनैतिक परिसरामध्ये एका इटालियन मदत कार्यकर्त्याची हत्या करण्यात आली. खतरनाक दहशतवादी संघटना इसिसने जबाबदारी घेतलेला हा बांगलादेशातील पहिलाच हल्ला आहे.
इटालियन कार्यकर्ते सी तावेला (५०) यांच्यावर येथील मार्केट गुलशन भागात अगदी जवळून तीन गोळ्या झाडण्यात आल्या. तावेला सोमवारी सायंकाळी जॉगिंग करत असताना हा हल्ला झाला. तावेला कोसळल्यानंतर हल्लेखोर घटनास्थळाहून फरार झाले. त्यांना तातडीने नजीकच्या खासगी रुग्णालयात नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. मारेकऱ्यांनी त्यांचा मोबाईल फोन किंवा पैशांची बॅग पळवून नेली नाही. त्यामुळे ही हत्या दरोड्याच्या उद्देशाने झाली नसल्याचे स्पष्ट आहे. दरम्यान, इस्लामिक स्टेटने एका निवेदनात तावेलाच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली. इसिसचा बांगलादेशातील हा पहिला हल्ला असू शकतो, असे सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले.