‘आॅक्सफर्ड’ला मिळणार पहिल्या महिला कुलगुरू

By Admin | Updated: May 30, 2015 00:14 IST2015-05-30T00:14:11+5:302015-05-30T00:14:11+5:30

ब्रिटनमधील सर्वांत जुन्या आणि आपल्या देदीप्यमान शैक्षणिक परंपरेसाठी ओळखल्या जाणाऱ्या आॅक्सफर्ड विद्यापीठाला शेकडो वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिला कुलगुरू मिळण्याची दाट शक्यता आहे.

First Lady VC to get 'Oxford' | ‘आॅक्सफर्ड’ला मिळणार पहिल्या महिला कुलगुरू

‘आॅक्सफर्ड’ला मिळणार पहिल्या महिला कुलगुरू

लंडन : ब्रिटनमधील सर्वांत जुन्या आणि आपल्या देदीप्यमान शैक्षणिक परंपरेसाठी ओळखल्या जाणाऱ्या आॅक्सफर्ड विद्यापीठाला शेकडो वर्षांच्या इतिहासात प्रथमच महिला कुलगुरू मिळण्याची दाट शक्यता आहे. लुईस रिचर्डसन (५६) यांचे नाव या पदासाठी सुचविण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.
प्रोफेसर रिचर्डसन सध्या सेंट अँड्रूज विद्यापीठाच्या कुलगुरू असून याआधी त्या ‘हॉर्वर्ड’मध्ये महत्त्वाच्या पदावर कार्यरत होत्या. रिचर्डसन यांची नियुक्ती झाल्यास त्या आॅक्सफर्डच्या २७२ व्या कुलगुरू ठरतील.
आॅक्सफर्ड विद्यापीठाने १२३० मध्ये पहिला प्रमुख नेमला होता आणि आतापर्यंत सर्व कुलगुरू हे पुरुष आहेत. ब्रिटनमध्ये एकोणिसाव्या शतकात महिलांसाठी पहिले स्वतंत्र महाविद्यालय सुरू झाले. १९७४ नंतर पुरुषांसाठीच्या महाविद्यालयांनी महिलांनाही प्रवेश देण्यास प्रारंभ केला. (वृत्तसंस्था)


माझे आई-वडील कॉलेजला गेले नव्हते. माझ्या बहुतांश भावंडांनीही कॉलेज शिक्षण घेतले नव्हते. माझ्या आयुष्यात शिक्षणामुळे बदल झाला. त्यामुळे इतरांनाही ही संधी मिळावी म्हणून मी बांधील आहे, असे रिचर्डसन म्हणाल्या.
रिचर्डसन यांचा जन्म आयर्लंडमधील असून डब्लिन येथील ट्रिनिटी कॉलेजमध्ये त्यांचे शिक्षण झाले. २००९ पासून त्यासेंट अँड्रूज विद्यापीठाच्या कुलगुरू आहेत. राज्यशास्त्राच्या प्राध्यापक असलेल्या रिचर्डसन यांनी सुरक्षा आणि दहशतवाद या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केले आहे.
 

Web Title: First Lady VC to get 'Oxford'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.