शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

आधी चर्चेला बोलावलं अन् नंतर हाकलून लावलं; नेपाळमध्ये Gen-Zसोबत चर्चेचा खेळ गडबडला?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2025 14:00 IST

नेपाळमध्ये सुरू झालेले जेन-झी आंदोलन आता नियंत्रणाबाहेर जात आहे. तीन दिवसांत २० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे.

सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील बंदी आणि भ्रष्टाचाराविरुद्ध नेपाळमध्ये सुरू झालेले जेन-झी आंदोलन आता नियंत्रणाबाहेर जात आहे. तीन दिवसांत २० हून अधिक लोकांचा बळी गेला आहे आणि शेकडो जखमी झाले आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली की पंतप्रधान के.पी. शर्मा ओली यांना राजीनामा देऊन काठमांडू सोडावे लागले. आता संपूर्ण देशाची सूत्रे नेपाळी लष्कराच्या हाती आली आहेत.

लष्करप्रमुख अशोक राज सिग्देल यांनी स्वतः एक व्हिडीओ संदेश जारी करून निदर्शकांना चर्चेसाठी बोलावले होते. पण जेव्हा काही गट त्यांच्याकडे चर्चेसाठी पोहोचले, तेव्हा लष्करानेच त्यांच्या प्रामाणिकपणावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि त्यांना परत पाठवून दिले. सूत्रांच्या माहितीनुसार, पुरुषोत्तम यादव यांच्या नेतृत्वाखालील गटाला परत पाठवण्यात आले, तर रबीकिरण हमाल यांच्या नावाने आणखी एक निवेदन जारी करण्यात आले. यामुळे आता सैन्य गोंधळून गेले आहे. इतकाच नाही तर, आंदोलनकर्ते स्वतःच खरा नेता कोण आहे, हे ठरवू शकत नाहीत. यामुळेच Gen-Zसोबत चर्चेचा संपूर्ण खेळ बिघडला आहे.

राष्ट्रपतींचे अपीलही झाले अयशस्वी!राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनीही तरुणांना संवादाचा मार्ग स्वीकारण्याचे आवाहन केले आहे. मंगळवारी रात्री शितल निवास येथे सिग्देल आणि युवा प्रतिनिधींमध्ये झालेल्या अनौपचारिक चर्चेनंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. या चर्चेचा मुख्य अजेंडा संसद बरखास्त करणे, नवीन सरकार स्थापन करणे आणि निवडणुका घेणे असेल. परंतु सध्याच्या संविधानानुसार, नवीन सरकार स्थापन करणे सध्या अशक्य दिसत आहे. नेपाळ लष्कर सध्या सुरक्षेची जबाबदारी सांभाळत आहे, परंतु राजकीय तोडगा काढणे देखील त्यांच्यासाठी कठीण काम बनले आहे.

सर्वांच्या नजरा बालेन शाहवर!या संपूर्ण लढाईत काठमांडूचे महापौर बालेन शाह हे सर्वात जास्त चर्चेत असलेले नाव आहे. तरुणांचा एक मोठा वर्ग त्यांच्या बाजूने असून, त्यांनी नेतृत्त्व स्वीकारावे, अशी मागणी करत आहे. पण शाह आतापर्यंत गप्प आहेत. चळवळीत संघटित नेतृत्वाचा अभाव असल्याने त्यांची दिशा गोंधळली आहे. सैन्य वाटाघाटी करू इच्छिते, परंतु आता त्यांच्यासोबत चर्चा करून तोडगा काढण्यासाठी कोणताही एक ठोस प्रतिनिधी नाही. परिणामी नेपाळ सध्या प्रशासनाच्या कोंडीत अडकले आहे आणि नेतृत्वहीनतेमुळे Gen-Z चळवळ वेगळ्याच दिशेने वाटचाल करत आहे.

टॅग्स :Nepalनेपाळagitationआंदोलन