अमेरिकेत दोन ठिकाणी गोळीबार, महिलेसह ३ ठार

By Admin | Updated: August 28, 2015 03:15 IST2015-08-28T03:15:15+5:302015-08-28T03:15:15+5:30

अमेरिकेत गुरुवारी वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या गोळीबारात पोलीस अधिकाऱ्यासह तीन जण ठार, तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या.

Firing in two places in the United States, 3 killed with a woman | अमेरिकेत दोन ठिकाणी गोळीबार, महिलेसह ३ ठार

अमेरिकेत दोन ठिकाणी गोळीबार, महिलेसह ३ ठार

ह्यूस्टन : अमेरिकेत गुरुवारी वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या गोळीबारात पोलीस अधिकाऱ्यासह तीन जण ठार, तर दोन महिला गंभीर जखमी झाल्या.
लुईझियाना राज्याच्या दक्षिणपूर्व उपनगर सनसेटमध्ये हल्लेखोर हॅरिसन ली वाईले (ज्युनिअर) हा कार घेऊन आला व स्टोअरमध्ये येऊन त्याने ते बंद करून घेतले. तेथील पोलीस अधिकारी हेन्री विल्सन हे जागीच ठार झाले, तर धारदार शस्त्राने केलेल्या हल्ल्यात तीन महिला गंभीर जखमी झाल्या. त्यातील शैमेका जॉन्सन यांचा रुग्णालयात मृत्यू झाला. हल्लेखोरास अटक करण्यात आली आहे.
टेक्सासमधील ह्यूस्टनमध्ये शाळेच्या पार्किंगमध्ये झालेल्या गोळीबारात एक जण ठार झाला. या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आले आहे. (वृत्तसंस्था)

Web Title: Firing in two places in the United States, 3 killed with a woman