अमेरिकेतील टेक्सासमध्ये गोळीबार
By Admin | Updated: June 15, 2016 00:05 IST2016-06-14T22:49:30+5:302016-06-15T00:05:42+5:30
अमेरिकेतल्या एमेरिल्लोतल्या वॉलमार्ट स्टोअरमध्ये काही अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याचं वृत्त एपी या वृत्तसंस्थेनं दिलं आहे.

अमेरिकेतील टेक्सासमध्ये गोळीबार
ऑनलाइन लोकमत
टेक्सास, दि. 14 - अमेरिकेत पुन्हा गोळीबाराची घटना समोर आली आहे. अमेरिकेतल्या अमरिल्लोतल्या वॉलमार्ट स्टोअरमध्ये काही अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याचं वृत्त एपी या वृत्तसंस्थेनं दिलं आहे. घटनास्थळी पोलीस दाखल झाले असून, वॉलमार्टमध्ये अडकलेल्या अनेक जणांना पोलिसांनी सुखरूपस्थळी हलवले आहे. तसेच गोळीबार करणा-या संशयितालाही पोलिसांनी ठार केल्याची माहिती समोर येत असून, या ठिकाणी सध्या कोणताही गोळीबार होत नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याचबरोबर अमरिल्लोतल्या वॉलमार्ट परिसरातील लोकांनी येणं टाळावं, असं आवाहनही पोलिसांनी यावेळी केलं आहे.
दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेतल्या ओरलँडोतल्या गे नाइट क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार करण्यात आला होता. यामध्ये 50हून अधिक जणांना प्राण गमवावा लागला होता. तर अनेक जण जखमी झाले होते. या क्लबमध्ये अंदाधुंद गोळीबार करणा-या मतीन या तरुणाला पोलिसांनी ठार केलं असून, या हल्ल्याची इसिस या दहशतवादी संघटनेनं जबाबदारी स्वीकारली आहे.