नेपाळमध्ये गोळीबार; मधेशी विद्यार्थी ठार

By Admin | Updated: December 20, 2015 23:15 IST2015-12-20T23:15:55+5:302015-12-20T23:15:55+5:30

दक्षिण नेपाळ भागात गौर येथे रविवारी मधेशींचे आंदोलन सुरू असताना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ताव्रेज आलम हा दहावीचा विद्यार्थी ठार झाला.

Firing in Nepal; Hateful student killed | नेपाळमध्ये गोळीबार; मधेशी विद्यार्थी ठार

नेपाळमध्ये गोळीबार; मधेशी विद्यार्थी ठार

काठमांडू : दक्षिण नेपाळ भागात गौर येथे रविवारी मधेशींचे आंदोलन सुरू असताना पोलिसांनी केलेल्या गोळीबारात ताव्रेज आलम हा दहावीचा विद्यार्थी ठार झाला.
भारतीय वंशाचे मधेशी चार महिन्यांपासून नव्या घटनेच्या विरोधात आंदोलन करीत आहेत. सुमारे १५०० निदर्शकांनी आज पोलिसांवर बाटल्या व दगड फेकले. ताव्रेज घटनादुरुस्ती विधेयकाची प्रत जाळण्याचा प्रयत्न करीत होता, त्यावेळी त्याला गोळी लागली. तो खाली पडल्यानंतरही पोलिसांनी त्याला लाथा मारल्या. ‘द हिमालय टाइम्स’ ने याबाबत वृत्त दिले.

Web Title: Firing in Nepal; Hateful student killed