अमेरिकेत ट्रम्प विरोधी रॅलीजवळ गोळीबार
By Admin | Updated: November 10, 2016 17:31 IST2016-11-10T17:31:22+5:302016-11-10T17:31:22+5:30
अमेरिकेच्या सिएटल शहरात डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात निदर्शने सुरु असताना जवळच गोळीबाराची घटना घडली.

अमेरिकेत ट्रम्प विरोधी रॅलीजवळ गोळीबार
ऑनलाइन लोकमत
सिएटल, दि. १० - अमेरिकेच्या सिएटल शहरात डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात निदर्शने सुरु असताना जवळच गोळीबाराची घटना घडली. यामध्ये पाचजण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर आहे. राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत ट्रम्प यांनी मिळवलेल्या आश्चर्यकारक विजयाच्या विरोधात ही निदर्शने सुरु होती.
बुधवारी स्थानिक वेळेनुसार सातच्या सुमारास ही गोळीबाराची घटना घडली. हा गोळीबार ट्रम्प विरोधी रॅलीला लक्ष्य करण्याच्या इराद्याने झाला होता का ? ते स्पष्ट झालेले नाही.