अमेरिकेमधल्या मिनीपोलीसमध्ये गोळीबार, 6 जण जखमी
By Admin | Updated: October 3, 2016 18:30 IST2016-10-03T18:30:39+5:302016-10-03T18:30:39+5:30
अमेरिकेमधल्या उचभ्रू वस्ती असलेल्या मिनीपोलीस शहरात दोन ठिकाणी केलेल्या गोळीबारात आतापर्यंत 6 जण जखमी झाले

अमेरिकेमधल्या मिनीपोलीसमध्ये गोळीबार, 6 जण जखमी
ऑनलाइन लोकमत
मिनीपोलिस, दि. 3 - अमेरिकेमधल्या उचभ्रू वस्ती असलेल्या मिनीपोलीस शहरात दोन ठिकाणी अज्ञातांनी केलेल्या गोळीबारात आतापर्यंत 6 जण जखमी झाले आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार, पहिल्यांदा गोळीबार केलेल्या गोळीबारात दोन जण जखमी झाले होते. घटनास्थळी एक व्यक्ती गोळीबार करताना आढळला आहे. तर या घटनेच्या 15 मिनिटांनंतर जवळच असलेल्या मेडिकल सेंटरमध्ये दुसरा गोळीबार करण्यात आला. पोलिसांच्या माहितीनुसार गोळीबारात 5 जण जखमी झाले आहेत. मात्र केएसटीपी टीव्ही रिपोर्टनुसार गोळीबारात 6 जण जखमी आहेत. पोलीस या गोळीबाराचा अधिक तपास करत आहेत.