मेक्सिकोत नाइट क्लबमध्ये गोळीबार, पाच ठार

By Admin | Updated: January 17, 2017 00:15 IST2017-01-17T00:15:40+5:302017-01-17T00:15:40+5:30

मेक्सिको येथील समुद्रकिनारी असलेल्या ब्लू पॅरट नाइट क्लबमध्ये सुरू असलेल्या इलेक्ट्रॉनिक संगीत महोत्सवात गोळीबार करण्यात आला

Firing in Mexico City night club, five killed | मेक्सिकोत नाइट क्लबमध्ये गोळीबार, पाच ठार

मेक्सिकोत नाइट क्लबमध्ये गोळीबार, पाच ठार

ऑनलाइन लोकमत
मेक्सिको, दि. 17 - मेक्सिको येथील समुद्रकिनारी असलेल्या ब्लू पॅरट नाइट क्लबमध्ये सुरू असलेल्या इलेक्ट्रॉनिक संगीत महोत्सवात गोळीबार करण्यात आला आहे. या गोळीबारात चार जणांचा मृत्यू झाला आहे. गोळीबारानंतर नाइट क्लबमध्ये लोकांची पळापळ सुरू झाली. त्यामुळे झालेल्या चेंगराचेंगरीत एक महिला ठार झाली, १५ जण जखमी झाले आहेत. चार जणांना या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले असून, मृतांमध्ये चारही पुरुष आहेत. नाइट क्लबमध्ये कोणत्या तरी वादातून मारामाऱ्या होऊन हा गोळीबार झाला, असे क्विंटॅना रूचे सरकारी वकील मिग्युएल अँजल पेच यांनी सांगितले.

Web Title: Firing in Mexico City night club, five killed