अमेरिकेतील मॉलमध्ये गोळीबार, ४ ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2016 11:12 IST2016-09-24T10:56:15+5:302016-09-24T11:12:44+5:30

अमेरिकेतील वॉशिंग्टनजवळील सिएॅटल येथील एका मॉलमध्ये बंदूकधा-याने केलेल्या हल्ल्यात ४ जण ठार झाले आहेत.

Firing in the mall in the United States, 4 killed | अमेरिकेतील मॉलमध्ये गोळीबार, ४ ठार

अमेरिकेतील मॉलमध्ये गोळीबार, ४ ठार

ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि. २४ - अमेरिकेतील सिएॅटल जवळील बर्लिंग्टन शहरातील एका मॉलमध्ये बंदूकधा-याने केलेल्या हल्ल्यात ४ जण ठार झाले असून काही जण जखमी झाले आहेत. मात्र या हल्ल्यामागे नेमका कोणाचा हात आहे हे अद्याप समजू शकलेलं नाही. 
मिळालेल्या माहितीनुसार,  सिएॅटल शहरापासून१०५ किमी अंतरावर असलेल्या बर्लिंग्टन येथील कॅस्केड मॉलमध्ये शुक्रवारी संध्याकाळी अज्ञात हल्लेखोराने अंदाधुंद गोळीबार केला. हल्ल्याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मॉल तत्काळ रिकामा केला. गोळीबारावेळी काळ्या रंगाचे घातलेला एक इसम संशयास्पद रितीने फिरताना आढळला होता मात्र हल्ल्यांनतर तो तेथून तत्काळ पसार झाला असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत. 

 

Web Title: Firing in the mall in the United States, 4 killed