फ्रान्समध्ये गोळीबार, दोन जण जखमी
By Admin | Updated: March 16, 2017 19:10 IST2017-03-16T18:57:54+5:302017-03-16T19:10:57+5:30
फ्रान्सच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या एका माध्यमिक विद्यालयात गोळीबार झाला. या गोळीबारात दोन जण जखमी झाले आहेत.

फ्रान्समध्ये गोळीबार, दोन जण जखमी
>ऑनलाइन लोकमत
पॅरिस, दि. 16 - फ्रान्सच्या दक्षिणेकडील भागात असलेल्या एका माध्यमिक विद्यालयात गुरुवारी गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोन जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, फ्रान्सच्या दक्षिणेकडील ग्रासिस परिसरात असलेल्या एका माध्यमिक विद्यालयात गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात दोन जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर, या विद्यालयाच्या आवारात एका विद्यार्थ्याला बंदुकीसहीत ग्रेनेड नेताना पोलिसांनी अटक केली आहे. तर, एक जण संशयित पळून गेल्याची माहिती मिळते. दरम्यान, गोळीबार करण्यात आल्यानंतर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी घाबरुन बाजूला असलेल्या सुपरमार्केटमध्ये पळ काढला. घटनास्थळी पोलिसांनी घेराव घातला असून, फ्रान्समधील सर्व शाळा आणि कॉलेजमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आले आहे.