वॉशिंग्टनमधील कॅपिटोल परिसरात गोळीबार
By Admin | Updated: March 29, 2016 05:22 IST2016-03-29T01:01:12+5:302016-03-29T05:22:30+5:30
अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टन डीसी येथील कॅपिटोल परिसरात एका व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात येथील एक पोलीस अधिकारी जखमी झाला आहे.

वॉशिंग्टनमधील कॅपिटोल परिसरात गोळीबार
>ऑनलाइन लोकमत
वॉशिंग्टन, दि.२९ - अमेरिकेची राजधानी असलेल्या वॉशिंग्टन डीसी येथील कॅपिटोल परिसरात एका व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात येथील एक पोलीस अधिकारी जखमी झाला आहे.
कॅपिटोल व्हिजिटर्स सेंटर्समधील पर्यटकांसाठी उपलब्ध असलेल्या आवारात एका व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात एक पोलीस अधिकारी किरकोळ जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर, गोळीबार करणा-या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु आहे.
दरम्यान, सुरक्षतेच्या कारणास्तव गोळीबार झाल्यानंतर या ठिकाणी असलेले व्हाईट हाऊस आणि यूएस कॉंग्रेस काही काळ बंद करण्यात आले होते.