अमेरिकेत गोळीबार; हल्लेखोरासह ५ ठार

By Admin | Updated: February 8, 2015 23:52 IST2015-02-08T23:52:18+5:302015-02-08T23:52:18+5:30

अटलांटा उपनगर पाच जणांच्या हत्याकांडाने हादरले असून, एका बंदूकधारी व्यक्तीने पश्चिम अटलांटास्थित एका घरात घुसून बेछूट गोळीबार केला

Firing in America; 5 killed with overcrowding | अमेरिकेत गोळीबार; हल्लेखोरासह ५ ठार

अमेरिकेत गोळीबार; हल्लेखोरासह ५ ठार

डग्लसविले : अटलांटा उपनगर पाच जणांच्या हत्याकांडाने हादरले असून, एका बंदूकधारी व्यक्तीने पश्चिम अटलांटास्थित एका घरात घुसून बेछूट गोळीबार केला. यात चार जण ठार, तर दोन मुले जखमी झाले. बंदूकधारीही मारला गेल्याचे डग्लस प्रातांचे शेरीफ लेफ्ट. ग्लेन डॅनियल यांनी सांगितले.
स्थानिक वेळेनुसार दुपारी ३ वाजता फोन आल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळाकडे धाव घेतली. हल्लेखोराने अटलांटा उपनगरातील एका घरात घुसून आपली माजी पत्नी आणि मुलांना गोळ्या घातल्या. हल्लेखोरही स्वत: बंदुकीच्या फैरीत मारला गेला. हल्लेखोर आणि मृतांचे नातेसंबंध काय होते, याचा पोलीस तपास करीत आहेत. (वृत्तसंस्था)

 

 

Web Title: Firing in America; 5 killed with overcrowding

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.