विएन्ना सुपरमार्केटमध्ये गोळीबार करणारा बंदुकधारी ठार
By Admin | Updated: July 3, 2016 07:35 IST2016-07-03T07:27:59+5:302016-07-03T07:35:01+5:30
ऑस्ट्रियाच्या विएन्ना शहरातील एका सुपरमार्केटमध्ये घुसून एका बंदुकधा-याने अंदाधुंद गोळीबार केला.

विएन्ना सुपरमार्केटमध्ये गोळीबार करणारा बंदुकधारी ठार
ऑनलाइन लोकमत
विएन्ना, दि. ३ - टर्की, बांगलादेशमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या घटना ताज्या असताना शनिवारी ऑस्ट्रियाच्या विएन्ना शहरातील एका सुपरमार्केटमध्ये घुसून एका बंदुकधा-याने अंदाधुंद गोळीबार केला. स्थानिक पोलिसांच्या कमांडो पथकाने तात्काळ केलेल्या कारवाईत हा बंदुकधारी ठार झाला.
या कारवाईत दोन पोलिस जखमी झाले आहेत. हा दहशतवादी हल्ला होता का ? ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. विएन्नामधील काही भागात शोधमोहिम सुरु आहे. स्थानिक वेळेनुसार संध्याकाळी सातच्या सुमारास बिला सुपरमार्केटमध्ये हा हल्ला झाला.
या संपूर्ण भागाला घेराव घालण्यात आला असून, सुरक्षेसाठी हॅलिकॉप्टर्स तैनात करण्यात आली आहेत. या हल्ल्यात जखमी झालेल्या दोन पोलिसांच्या प्रकृतीबद्दल माहिती मिळू शकलेली नाही.